यावर्षी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती अधिक संवेदनशील असल्याचे चित्र आहे. महापालिका निवडणुकांचा काळ सुरू असल्याने पोलिस यंत्रणा आणि प्रशासन आधीच सतर्क आहे. त्यातच 31 डिसेंबरच्या जल्लोषामुळे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आव्हान अधिक वाढले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
रात्री दीड वाजेपर्यंत परवाना
नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर शहरातील परवानाधारक हॉटेल्स, पब आणि क्लबना रात्री दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास अटींसह परवानगी देण्यात आली आहे. या ठिकाणी क्षमतेपेक्षा अधिक गर्दी किंवा नियमांचे उल्लंघन करून मद्यविक्री होत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर तात्काळ कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
ब्रेथ अॅनालायझरचा वापर करणार
मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून ब्रेथ अॅनालायझरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जाणार आहे. शहरातील विविध नाकाबंदी ठिकाणी वाहनांची तपासणी केली जाणार असून, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवताना कोणी आढळल्यास वाहन जप्ती, दंडात्मक कारवाई तसेच गुन्हा नोंदवला जाणार आहे






