TRENDING:

MHADA Shops Sale : ठाणेकर ही संधी सोडू नका, घर नव्हे आता म्हाडा देतंय स्वस्तात गाळा, पाहा लोकेशन

Last Updated:
Thane MHADA Commercial Premises for sale : ठाण्यातील चितळसर-मानपाडा येथे म्हाडाने 27 अनिवासी गाळ्यांच्या विक्रीसाठी ई-लिलाव जाहीर केला आहे. परवडणाऱ्या दरात व्यवसायासाठी जागा मिळवण्याची ही उत्तम संधी असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 नोव्हेंबर 2025 आहे.
advertisement
1/6
ठाणेकर ही संधी सोडू नका, घर नव्हे आता म्हाडा देतंय स्वस्तात गाळा
आपल्यापैंकी अनेकजण आहेत जे स्वता:चा व्यवसाय ठाणे किंवा मुंबई या शहरात सुरु करु इच्छित आहेत. पण या महागड्या शहरात व्यवसायासाठी गाळ मिळणे अतिशय मोठी कसरत सामान्यसाठी असते. पण आता काळजी नाही सामान्यांचे हे स्वप्न होणार आहे
advertisement
2/6
सध्या म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे ठाणे शहरातील चितळसर–मानपाडा परिसरातील विविध इमारतींत 27 अनिवासी गाळ्यांच्या विक्रीसाठी ई-लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
advertisement
3/6
व्यापाऱ्यांसाठी तसेच नवीन व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही फायदेशीर संधी आहे.
advertisement
4/6
ई-लिलावासाठी नोंदणी आणि अर्ज प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली असून इच्छुक अर्जदारांनी www.eauction.mhada.gov.inया संकेतस्थळावर जाऊन सर्वप्रथम नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करताना वैयक्तिक तपशील, आवश्यक कागदपत्रे आणि संपर्क माहिती अचूकपणे भरावी. चुकीची माहिती दिल्यास अर्ज बाद होऊ शकतो.
advertisement
5/6
ई-लिलावासाठी अर्ज आणि अनामत रक्कम जमा करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2025 असून यानंतर 25 नोव्हेंबर 2025 रोजी ऑनलाइन बोली सुरू होईल, ज्यामध्ये सर्व बोलीदार एकमेकांशी स्पर्धा करून किंमत ठरवतील. लिलावाचा अंतिम निकाल 26 नोव्हेंबर 2025 रोजी जाहीर करण्यात येईल.
advertisement
6/6
याशिवाय अधिक माहिती वाचण्यासाठी अर्जदार www.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळालाही भेट देऊ शकतात. नोंदणी दरम्यान दिलेली माहिती, गाळ्यांचे प्रकार, क्षेत्रफळ, किमान बोली किंमत आणि आवश्यक कागदपत्रांची सूची या सर्व तपशीलांची खात्री करून मगच पुढील प्रक्रिया करा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ठाणे/
MHADA Shops Sale : ठाणेकर ही संधी सोडू नका, घर नव्हे आता म्हाडा देतंय स्वस्तात गाळा, पाहा लोकेशन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल