TRENDING:

Thane : 24 बाय सेव्हन, आता नो टेन्शन, गोल्डन अवरमध्ये लगेच उपचार, 20 मिनिटांत रुग्णवाहिका दारात, योजना काय?

Last Updated:
Thane : ठाणे शहरात तुम्ही राहात असाल आणि तुम्हाला रुग्णालयात जायचे आहे तर आता तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही. ठाणे महानगरपालिकेने नागरिकांसाठी एक महत्त्वाची सेवा सुरु केलेली आहे.
advertisement
1/7
 24 बाय सेव्हन, आता नो टेन्शन,  20 मिनिटांत रुग्णवाहिका दारात, योजना काय?
ठाणे शहरातील नारिकांना आता आता आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकेची जास्त वेळ वाट पाहण्यासाठी गरज भासणार नाही.
advertisement
2/7
गेल्या काही वर्षात ठाणे शहरात अनेक गोष्टींमुळे नागरिकांचे स्थलांतर वाढलेले आहे. ज्यामुळे या भागात नागरी वस्तीत आरोग्याच्या समस्या आल्याच.
advertisement
3/7
वाढत्या लोकसंख्येमुळे ठाणे शहरात आधीच असलेल्या रुग्णवाहिका कमी पडत आहे त्यामुळे ठाणे महानगरपालिकेने कोरोनातकाळीतल पद्धतीने प्रमाणे परत एकदा भाडेतत्त्वावर रुग्णवाहिका घेण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
4/7
आता ठाणे शहरातील नागरिकांना आवश्यक असल्यास फक्त 15 ते 20 मिनिटांत रुग्णवाहिका उपलब्ध होणार आहे, असा विश्वास महापालिकेच्या आरोग्य विभागाने व्यक्त केलेला आहे.
advertisement
5/7
ठाण्यातील घोडबंदरपासून ते शिळ या भागातील रुग्णांना अवघ्या काही क्षणात जवळच्या सरकारी रुग्णालयात तर महिलांना प्रसूतिगृहात आणि आरोग्य केंद्रांत नेण्यासाठी या रुग्णवाहिका उपलब्ध होतील.
advertisement
6/7
ठाण्यात सध्या महापालिकेचे 33 आरोग्य केंद्रे तर 6 प्रसूतिगृहे आणि कळवा येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्णांची ये-जा होत असते.
advertisement
7/7
15 ते 20 मिनिटांत रुग्णवाहिका रुग्णांपर्यंत पोहचण्याची सेवा ही फक्त पाच वर्षांच्या कालावधीसाठी देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र दोन वर्षांनंतर दरात 3 टक्के वाढ लागू होईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ठाणे/
Thane : 24 बाय सेव्हन, आता नो टेन्शन, गोल्डन अवरमध्ये लगेच उपचार, 20 मिनिटांत रुग्णवाहिका दारात, योजना काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल