Weather Alert: उत्तरेतून आलं संकट, कल्याण-डोंबिवलीत हवापालट, IMD चा पुन्हा अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:GEETA PANDHARINATH GAIKAR
Last Updated:
Weather Alert: ठाण्यासह कल्याण-डोंबिवली, शहापूर, बदलापूर आणि मुरबाड परिसरात हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. आजचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
1/5

उत्तर भारतातून येणाऱ्या शीतलहरींमुळे राज्यात थंडीची लाट निर्माण झाली आहे. गेल्या आठवडाभरात उत्तर महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला होता. ठाण्यासह कल्याण-डोंबिवली परिसरात देखील गारठा वाढला होता. आता डिसेंबरच्या मध्यावर हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत आहेत. 13 डिसेंबरचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/5
कल्याण तालुक्यात शुक्रवारच्या तुलनेत आज थंडी अधिक जाणवेल. हवामान थंड आणि काहीसे धुक्याचे असेल तर किमान तापमान 13 ते 14 अंश सेल्सिअसपर्यंत राहील. कमाल तापमान 30 ते 33 अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सकाळी थंडी आणि दुपारी उकाडा जाणवेल.
advertisement
3/5
डोंबिवलीत सकाळी हवामान स्वच्छ आणि आल्हाददायक राहील, दिवसा भरपूर सूर्यप्रकाश असल्याने साधारणपणे कमाल तापमान 31°C पर्यंत, तर किमान तापमान 20 ते 22°C च्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. ज्यामुळे सकाळ आणि रात्री गारठा जाणवेल. तर दिवसा हवामान स्वच्छ व उबदार असेल.
advertisement
4/5
आज कल्याण डोंबिवली ग्रामीण भागात शुक्रवारच्या तुलनेत तापमानात घट झाल्याने थंडी असेल. पारा 13 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला असून, किमान तापमान 12°C ते 15°C दरम्यान राहील. तर कमाल तापमान 24 ते 26°C असल्याने ग्रामीण भागात दिवसभर गारवा जाणवत आहे. पुढील काही दिवस या भागात थंडीचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे.
advertisement
5/5
बदलापूरमध्ये तापमानात चढउतार होताना दिसत आहेत. आज हवामान साधारणपणे स्वच्छ आणि कोरडे राहण्याची शक्यता आहे. किमान 15°C तर कमाल तापमान 30 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. शहापूर आणि मुरबाडमध्ये अंधुक सूर्यप्रकाश आणि स्वच्छ आकाश राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान 12 ते 15 अंश तर कमाल 29 ते 30 अंश सेल्सिअस राहील. पुढील काही दिवस हवामानाची हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ठाणे/
Weather Alert: उत्तरेतून आलं संकट, कल्याण-डोंबिवलीत हवापालट, IMD चा पुन्हा अलर्ट