Donald Trump Love Story : नरजेला नजर भिडली अन् ट्रम्प प्रेमात पडले, 1.5 मिलियन डॉलर अंगठी अन् थेट प्रपोज केलं!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
2024 united states elections : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झालं. त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्रपती झाले आहेत. मात्र, तुम्हाला डोनाल्ड ट्रम्प यांची लव स्टोरी (Donald Trump Love Story) माहितीये का?
advertisement
1/9

डोनाल्ड ट्रम्प हे एक सुप्रसिद्ध अमेरिकन उद्योगपती तसेच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. डोनाल्ड ट्रम्प वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतात. डोनाल्ड ट्रम्प यांचे काही रंजक किस्से जाणून घ्या.
advertisement
2/9
डोनाल्ड ट्रम्प यांनी तीन वेळा लग्न केले आहे. त्यांची तिसरी पत्नी मेलानिया ट्रम्प आहे. मेलानिया ट्रम्प आणि डोनाल्ड ट्रम्प यांची लव स्टोरी देखील खूप अनोखी आहे. पहिल्या भेटीतच ट्रम्प यांनी हृदय देऊन बसले होते.
advertisement
3/9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लग्नाचा किस्सा खूपच रंजक आहे. ट्रम्प यांचे पहिले लग्न 1977 मध्ये इव्हानासोबत झाले होते. दोघांची पहिली भेट 1976 साली एका हॉटेलमध्ये झाली होती. ट्रम्प यांचे लग्न जवळपास 13 वर्षे टिकलं.
advertisement
4/9
ट्रम्प यांना पहिल्या पत्नीपासून तीन मुलं आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांची दुसरी पत्नी अमेरिकन अभिनेत्री, मॉडेल आणि गायिका मार्ला मॅपल्स होती. पहिल्या पत्नीपासून घटस्फोटाच्या दरम्यानच त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू होत्या.
advertisement
5/9
डोनाल्ड ट्रम्प आणि मार्ला मॅपल्स यांनी 1993 मध्ये एकमेकांशी लग्न केलं. पण हे नातंही केवळ चार वर्षे टिकलं आणि त्यानंतर 1999 मध्ये दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. ट्रम्प यांच्या बॉडीगार्डसोबत मार्ला यांचे प्रेमसंबंध होते, अशीही चर्चा होती.
advertisement
6/9
ट्रम्प यांना दुसऱ्या पत्नीपासून एक मुलगी आहे. वयाच्या 52 व्या वर्षी ट्रम्प यांचा एका मुलीवर जीव जडला. एके दिवशी डोनाल्ड ट्रम्प न्यूयॉर्क फॅशन वीकच्या पार्टीला गेले होते तिथे त्यांची मेलानियाशी भेट झाली अन् पहिल्या नजरेत ट्रम्प प्रेमात पडले.
advertisement
7/9
त्यानंतर भेटीच्या अवघ्या 5 मिनिटांतच डोनाल्ड ट्रम्प यांना मेलानियाचा फोन नंबर देखील मिळाला. वयाचं अंतर न पाहता ट्रम्प पुन्हा रिलेशनशीपमध्ये आले. ट्रम्प आणि मेलानिया यांच्यातील अफेअरची चर्चा सर्वत्र झाली. मात्र, काही काळात त्यांचं ब्रेकअप झालं.
advertisement
8/9
जेव्हा 2000 मध्ये ट्रम्प यांचा अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत पराभव झाला, तेव्हा मेलानिया यांनी ट्रम्प यांना साथ दिली. त्यानंतर दोघंही पुन्हा एकत्र दिसू लागले. तब्बल पाच वर्ष डेटिंग केल्यानंतर दोघांनी 2005 मध्ये लग्न केलं.
advertisement
9/9
दरम्यान, पाच वर्ष डेटिंग केल्यानंतर 1.5 दशलक्ष डॉलर किंमतीची अंगठी घालून ट्रम्प यांनी मेलानिया यांना प्रपोज केलं होतं. या लग्नापासून ट्रम्प यांना बॅरन ट्रम्प नावाचा मुलगा आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/विदेश/
Donald Trump Love Story : नरजेला नजर भिडली अन् ट्रम्प प्रेमात पडले, 1.5 मिलियन डॉलर अंगठी अन् थेट प्रपोज केलं!