General Knowledge : कोणत्या देशात समोसावर बंदी? कारण ऐकाल तर म्हणाल, 'असं कधी असतं का?'
- Published by:Devika Shinde
Last Updated:
असाच एक प्रश्न आम्ही तुमच्यासाठी आणला आहे, ज्याचं उत्तर फार कमी लोकांना देता येईल, एवढच नाही तर भारतीय लोक हा प्रश्न वाचून थोडे गोंधळतील देखील.
advertisement
1/6

सामान्य ज्ञानाच्या परीक्षांमध्ये कधी कधी असे प्रश्न विचारले जातात की ज्याची उत्तरं ऐकूनही आपल्याला आश्चर्य वाटतं. अशा प्रश्नांमुळेच स्पर्धा परीक्षा अधिक रोचक आणि आव्हानात्मक ठरतात.
advertisement
2/6
असाच एक प्रश्न आम्ही तुमच्यासाठी आणला आहे, ज्याचं उत्तर फार कमी लोकांना देता येईल, एवढच नाही तर भारतीय लोक हा प्रश्न वाचून थोडे गोंधळतील देखील.
advertisement
3/6
हा प्रश्न आहे असा कोणता देश आहे ज्यामध्ये समोसा खाण्यावर बंदी आहे? हा प्रश्न ऐकला की सुरुवातीला कुणालाही विश्वास बसणार नाही की असा देश ही असू शकतो जिथे समोसाला बंदी आहे. कारण समोर हा भारतात सरास दिसणारा आणि खाल्ला जाणारा पदार्थ आहे.
advertisement
4/6
आफ्रिकेतील सोमालिया या देशात वर्ष 2011 पासून समोसा बनवणे आणि खाणे यावर बंदी घालण्यात आली. ही बंदी तेथील दहशतवादी संघटना अल-शबाब यांनी घातली. पण असं का? आणि कशासाठी असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
advertisement
5/6
खरंतर या संघटनेने समोशाचा त्रिकोणी आकार ख्रिश्चन धर्मातील त्रिमूर्तीच्या प्रतीकाशी जोडला आणि तो इस्लामविरोधी असल्याचे घोषित केले. परिणामी, या संघटनेच्या नियंत्रणाखालील भागांमध्ये समोसा खाणे आणि विक्री करणे गुन्हा मानला जातो.
advertisement
6/6
भारतामध्ये समोसा हा अत्यंत लोकप्रिय पदार्थ आहे. चहा आणि समोशाची जोडी ही अनेकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. रस्त्याच्या टपऱ्यांपासून ते मोठ्या हॉटेलपर्यंत सर्वत्र समोसा सहज उपलब्ध होतो. त्यामुळे एखाद्या देशात या पदार्थावर बंदी असल्याचं ऐकून लोकांना आश्चर्य वाटणं साहजिकच आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/विदेश/
General Knowledge : कोणत्या देशात समोसावर बंदी? कारण ऐकाल तर म्हणाल, 'असं कधी असतं का?'