TRENDING:

Indian Railway : भारतातील या 5 ट्रेनचं तिकीट चुकूनही बुक करू नका, जिवंतपणी 'नरकात जाल'

Last Updated:
Dirtiest Train Of India : भारतातील या 5 ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या बऱ्याच तक्रारी आहेत. या ट्रेनने प्रवास करणं म्हणजे जणू नरकाचाच अनुभव आहे.
advertisement
1/7
भारतातील या 5 ट्रेनचं तिकीट चुकूनही बुक करू नका, जिवंतपणी 'नरकात जाल'
भारतीय गाड्या लांब प्रवासासाठी खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. त्या आपल्या भारतीयांचा प्रवास सोपा करतातच, शिवाय कमी वेळात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवतात.
advertisement
2/7
पण भारतीय रेल्वेच्या गाड्या आणि स्टेशन परिसराची स्वच्छता अनेकदा चर्चेत असते. रेल्वेमध्ये अशा काही गाड्या आहेत ज्यात प्रवास केल्यानंतर तुम्ही आजारी पडू शकता. त्या गाड्यांमधील दुर्गंधी आणि घाणीबद्दल प्रवासी सतत तक्रार करत राहतात.
advertisement
3/7
सहरसा-अमृतसर गरीब रथ ट्रेन : ही बिहार आणि पंजाबला जोडणाऱ्या महत्त्वाच्या गाड्यांपैकी एक आहे. तिच्या स्वच्छतेबद्दल अनेकदा प्रश्न उपस्थित केले जातात. ही ट्रेन देशातील सर्वात घाणेरड्या ट्रेनपैकी एक मानली जाते. या ट्रेनमध्ये अनेक सुविधांचा अभाव आहे. घाणेरडं शौचालय, घाणेरडे केबिन आणि दुर्गंधीयुक्त सिंकच्या तक्रारी अनेकदा येतात.
advertisement
4/7
सीमांचल एक्सप्रेस : ही ट्रेन दिल्लीतील आनंद विहार ते बिहारमधील जोगबनीपर्यंत धावते. या ट्रेनमधील प्रवाशांकडून रेल्वेला सर्वाधिक तक्रारी येतात. परंतु कदाचित आजपर्यंत रेल्वे प्रशासनाने त्याकडे लक्ष दिलेलं नाही.
advertisement
5/7
माता वैष्णोदेवी-वांद्रे स्वराज एक्सप्रेस : या ट्रेनचाही घाणेरड्या ट्रेनच्या यादीत समावेश आहे, कारण या ट्रेनमधील स्वच्छतेबद्दल अनेक लोकांनी तक्रारी केल्या आहेत. 2023 मध्ये रेल्वेला या ट्रेनबद्दल 61 तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे जर तुम्ही या ट्रेनचं तिकीट बुक केलं तर काळजी घ्या.
advertisement
6/7
फिरोजपूर-अगरतळा त्रिपुरा सुंदरी एक्सप्रेस : या ट्रेनमध्ये प्रवास करताना घाणीमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. प्रवाशांची तक्रार आहे की या ट्रेनमधील सीट्सची देखभालही व्यवस्थित केली जात नाही.
advertisement
7/7
अजमेर-जम्मू आणि तिहार पूजा एक्सप्रेस : या ट्रेनमध्ये बुकिंग करण्यापूर्वी प्रवाशांनी दोनदा विचार करावा. स्वच्छतेच्या बाबतीत या ट्रेनची प्रतिमा खूपच वाईट आहे. अनेकदा यासंबंधी तक्रारी प्राप्त होतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Indian Railway : भारतातील या 5 ट्रेनचं तिकीट चुकूनही बुक करू नका, जिवंतपणी 'नरकात जाल'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल