TRENDING:

मिस इंडिया व्हायचं होतं, तिनं UPSC दिली, 3 वेळा नापास झाली! चौथ्यांदा मात्र...

Last Updated:
स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी एकतर अभ्यासाला कंटाळून ध्येयाचा विचार सोडून देतात किंवा इतर सर्व गोष्ट सोडून ध्येयाच्या दिशेने वाटचाल करतात. एका मॉडेलनेही आपली आवड सोडून यूपीएससीचा अभ्यास करायला सुरूवात केली. तिने चारवेळा त्याच उत्साहाने परीक्षा दिली आणि 2022 साली 736वा क्रमांक मिळवला. (हिना आजमी, प्रतिनिधी / देहरादून)
advertisement
1/5
मिस इंडिया व्हायचं होतं, तिनं UPSC दिली, 3 वेळा नापास झाली! चौथ्यांदा मात्र...
उत्तराखंडची राजधानी असलेल्या देहरादूनची रहिवासी तस्कीन खान हिचं मॉडेलिंग करियर उत्तम सुरू होतं. परंतु तिने हे क्षेत्र सोडून अचानक यूपीएससीचा अभ्यास करायला सुरूवात केली. तीनवेळा तिच्या हाती अपयश आलं, मात्र तिने हार मानली नाही. 2022 साली चौथ्यांदा परीक्षा दिली आणि त्यात तिला उत्तम गुण मिळाले. तिने 736वा क्रमांक पटकावला.
advertisement
2/5
तस्कीनला आधीपासूनच  मॉडेलिंगची आवड होती. कुटुंबियांचाही तिला पूर्ण पाठिंबा होता. साल 2016-17मध्ये तिने मिस देहरादून आणि मिस उत्तराखंड किताब जिंकला. तिला मिस इंडिया व्हायचं होतं. परंतु वडील नोकरीतून निवृत्त होताच तिने यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. 
advertisement
3/5
तस्कीनसमोर अनेक अवघड प्रसंग आले, परंतु तिने अजिबात हार मानली नाही. तिचे वडील चार महिने रुग्णालयात होते. तेव्हा ती दिवस-रात्र रुग्णालयातच असायची. तिथेच ती अभ्यास करायची. वडील आयसीयूत असताना तिने तिची मुख्य परीक्षा दिली. 
advertisement
4/5
तस्कीनला शाळेत असल्यापासूनच अभ्यासाची प्रचंड आवड होती. परंतु कोणीही व्यक्ती आयुष्यात तीनवेळा अपयश आल्यावर चौथ्यांदा क्वचितच प्रयत्न करते. परंतु तस्कीनने मात्र चौथ्यांदा मोठ्या जिद्दीने परीक्षा दिली आणि त्यात तिला यश मिळालं. 
advertisement
5/5
आज तस्कीन खान लाखो तरुणांसाठी आदर्श ठरली आहे. तिला ब्युटी विथ ब्रेन म्हटलं जातं. विशेष म्हणजे तस्कीनला तिच्या एका इंस्टाग्राम फॉलोअरने यूपीएससीची तयारी करण्याचा सल्ला दिला होता. तो तिने गांभिर्याने घेतला आणि त्यात यश मिळवलं. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
मिस इंडिया व्हायचं होतं, तिनं UPSC दिली, 3 वेळा नापास झाली! चौथ्यांदा मात्र...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल