Aliens on moon : चंद्रावर आहेत एलियन्स? इस्रो प्रमुखांनी केला मोठा खुलासा
- Published by:Priya Lad
Last Updated:
काही लोक एलियन्स किंवा यूएफओ पाहिल्याचा दावा करतात. काही शास्त्रज्ञांनीही एलियन्सच्या अस्तित्वाला दुजोरा दिला आहे. आता भारतीय अंतराळ संस्था इस्रोच्या प्रमुखांनाही एलियन्सबाबत मोठी माहिती दिली आहे.
advertisement
1/5

अनेक जण एलियन्स असल्याचा दावा करतात. एलियन्स आहेत तर कुठे आहेत, असा प्रश्न पडतोच. काही शास्त्रज्ञांच्या मते एलियन्स दुसऱ्या ग्रहावर असू शकतात. मग चंद्रावरही एलियन्स आहेत का? चंद्रावर तीन चांद्रयान पाठवणाऱ्या इस्रोच्या प्रमुखांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे.
advertisement
2/5
चेन्ननकोडमध्ये राहणारा 9 वर्षांचा मुलगा अनंत पद्मनाभन ज्याला डोळ्यांची समस्या आहे, त्याच्यावर उपचार सुरू आहे. त्याला स्पेस सायन्सची खूप आवड. मीडिया रिपोर्टनुसार <a href="https://news18marathi.com/tag/space-news/">अंतराळाबाबत माहिती मिळवण्यासाठी त्याने इस्रोच्या प्रमुखांना अनेक प्रश्न विचारले</a>.
advertisement
3/5
भारत माणसाला चंद्रांवर कधी पाठवणार?, अंतराळात प्राण्यांना पाठवण्याची काही योजना आहे का?, चंद्रावर एलियन्स आहेत का? असे सवाल अनंतनं एस सोमनाथ यांना केले. त्यांनी त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरं व्हिडीओमार्फत दिली आहेत. (फाईल फोटो)
advertisement
4/5
इस्रो 2040 पर्यंत माणसाला अंतराळात पाठवण्याची योजना बनवत आहे. पण प्राण्यांना अंतराळात पाठवण्याची काही योजना नाही, असं त्यांनी सांगितलं. (फाईल फोटो)
advertisement
5/5
हिंदुस्तान टाइम्स टाइम्स ऑफ इंडियाचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार एस सोमनाथ यांनी चंद्रावर एलियन्स नाहीत असं स्पष्टपणे सांगितलं आहे. (फाईल फोटो)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Aliens on moon : चंद्रावर आहेत एलियन्स? इस्रो प्रमुखांनी केला मोठा खुलासा