Beer : तुम्हाला माहितीये बिअरच्या या झाकणाला 21 कडा असतात, कारणही आहे खास
- Published by:Priya Lad
Last Updated:
Beer Bottle Cap Crown Cork : किती तरी लोक बिअर पित असतील, बिअरचं झाकण त्यांनी उघडलं असेल. पण या बिअरच्या झाकणाकडे त्यांचंही लक्ष गेलं नसेल.
advertisement
1/7

पूर्वी कोल्ड ड्रिंकच्या बाटल्या काचेच्या असायच्या त्यावर ही अशी झाकणं असायची. कित्येकांना तर ही झाकणं जमवण्याची आवडही होती. याच्यासोबत कित्येक जण खेळलेही असतील. आताही तुम्ही बिअरच्या बाटल्यांवर अशी झाकणं पाहत असाल. पण तुम्ही कधी या झाकणाच्या कडा मोजल्या आहात का?
advertisement
2/7
या अशा झाकणांवर एकूण 21 कडा असतात. हा केवळ योगायोग नाही, तर यामागे एक उल्लेखनीय इतिहास आणि तंत्रज्ञान आहे. या 21 कडांची रचना जवळजवळ 130 वर्षे जुनी आहे.
advertisement
3/7
या झाकणांना क्राऊन कॅप म्हणतात. याचा शोध 1892 मध्ये विल्यम पेंटर नावाच्या व्यक्तीने लावला होता. तो बाल्टिमोरमधील क्राउन कॉर्क सील कंपनीचा संस्थापक देखील होता.
advertisement
4/7
विल्यम पेंटरने वेगवेगळ्या संख्येच्या रिब्स वापरून एक झाकण डिझाइन केलं जे बिअरचे ताजे बुडबुडे (कार्बोनेशन) त्याचा सुगंध न गमावता टिकवून ठेवेल.
advertisement
5/7
जेव्हा झाकण कमी रिब्ससह ठेवलं गेलं तेव्हा त्याचा सील गळला आणि कार्बन डायऑक्साइड नष्ट झाला. तसंच जेव्हा झाकण जास्त रिब्ससह ठेवलं गेलं तेव्हा झाकण ठिसूळ झालं आणि तुटलं. काही झाकणं सुरुवातीला 24 रिब्ससह बनवली गेली, ती स्वयंचलित मशीनमध्ये अडकत असत आणि उत्पादनात व्यत्यय आणत असत.
advertisement
6/7
अनेक प्रयत्नांनंतर त्यांना आढळलं की योग्य संतुलन फक्त 21 रिब्सच्या संख्येनेच शक्य आहे. जेव्हा 21 रिब्स असतात तेव्हा झाकणातील कार्बोनेशन दाब सहन करण्यास पुरेसं मजबूत असतं. त्याचवेळी ते बाटली सहजपणे उघडता येण्याइतकं लवचिक असतं. 21 ची ही संख्या यांत्रिक तत्त्वांनुसार बाटलीच्या टोपीवर स्थिर पकड निर्माण करण्यास मदत करते.
advertisement
7/7
त्यामुळे 21 रिब्स डिझाइन आंतरराष्ट्रीय मानक बनलं. विल्यम पेंटरने हा अद्भुत शोध लावल्याच्या 130 वर्षांनंतरही जगातील प्रत्येक बिअर कंपनी अजूनही त्याच 21 एज डिझाइनचं पालन करतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Beer : तुम्हाला माहितीये बिअरच्या या झाकणाला 21 कडा असतात, कारणही आहे खास