advertisement
1/7

प्रत्येकाच्या घरी मांजर ही हमखास आढळून येते. बऱ्याच लोकांना मांजर पाळायला आवडतं. मात्र या मांजरीपासून गंभीर आजार होण्याचीही भीती असते.
advertisement
2/7
ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासात काही आश्चर्यकारक तथ्ये समोर आली आहेत. संशोधनात असं दिसून आलं आहे की मांजरींसोबत राहिल्यानं स्किझोफ्रेनियाचा धोका दुप्पट होतो.
advertisement
3/7
स्किझोफ्रेनिया हा एक मानसिक आजार आहे ज्यामुळे पीडित व्यक्तीच्या विचार, समज आणि वागण्यात बदल होतो. या आजाराने ग्रस्त रुग्ण विनाकारण प्रत्येक गोष्टीवर संशय घेतो आणि स्वतःच्या जगात हरवून जातो. त्याला नेहमी असे वाटते की कोणीतरी आपल्याविरुद्ध कट रचत आहे किंवा आपल्याला चुकीच्या पद्धतीने एखाद्या प्रकरणात अडकवले जात आहे.
advertisement
4/7
संशोधकांच्या मते, टॉक्सोप्लाझ्मा गोंडी (T. gondii) हा परजीवी मांजरींपासून मानवापर्यंत पोहोचू शकतो. यामुळे, मानवांमध्ये स्किझोफ्रेनिया विकसित होऊ शकतो.
advertisement
5/7
संशोधकांच्या मते, टॉक्सोप्लाझ्मा गोंडी थेट मेंदूच्या न्यूरोट्रांसमीटरवर परिणाम करू शकतात आणि सूक्ष्म अल्सर तयार करू शकतात.
advertisement
6/7
संशोधकांच्या पथकाने 17 अभ्यासांचा आढावा घेतला. त्यानंतरच हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. टीमने गेल्या 44 वर्षांत प्रकाशित अमेरिका आणि ब्रिटनसह 11 देशांमधील विद्यमान संशोधनातील डेटाचे विश्लेषण केले आहे. त्यांना असं आढळलं की 25 वर्षापूर्वी मांजरींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना स्किझोफ्रेनिया होण्याची शक्यता जवळजवळ दुप्पट असते.
advertisement
7/7
उपचार तज्ज्ञांच्या मते, स्किझोफ्रेनिया पूर्णपणे बरा होऊ शकत नाही, परंतु वेळेवर ओळखल्यास, औषधे आणि वर्तणूक थेरपीने निश्चितपणे नियंत्रित केले जाऊ शकते.