कार की हेलिकॉप्टर? रस्त्यावर लोकांना जे दिसलं ते पाहून सर्वांना आश्चर्य; पाहा, अनोखे photos
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
तुम्ही सर्वांनी विमान, हेलिकॉप्टर आकाशात उडताना तर पाहिलेच असेल. मात्र, कधी तुम्ही हेलिकॉप्टर हे रस्त्यावर उडताना पाहिले आहे का? नाही ना. पण सध्या एका रस्त्यावर असंच एक हेलिकॉप्टर सारखे वाहन दिसत आहेत. नेमका का आहे प्रकार ते जाणून घेऊयात (कृष्ण कुमार, प्रतिनिधी)
advertisement
1/7

राजस्थान राज्यातील नागौरच्या रस्त्यावर आजकाल हेलिकॉप्टर सारखी रचना असलेली कार दिसत आहे. ही कार सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. एका व्यक्तीने आपली कार हेलिकॉप्टरसारखी बनवण्याचा प्रयत्न केला आहे. या व्यक्तीचे नाव शिभ्भूराम असे आहे.
advertisement
2/7
त्यांनी सांगितले की, मला बालपणापासूनच काहीतरी नवीन करण्याची इच्छा मनात होती. कार मॉडिफाय करण्याआधी मी हरियाणाला काही कामानिमित्त गेलो असताना तिथे अशी कार पाहिली आणि मला अशी कार बनवण्याची इच्छा झाली. मग मी ही कार मॉडिफाय करण्याबाबत माहिती गोळा केली.
advertisement
3/7
हरियाणातील कारची माहिती मिळाल्यानंतर मी माझ्या कारमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. परंतु राजस्थानमध्ये आवश्यक वस्तू न मिळाल्याने मी हरियाणा आणि बिहारमधून काही वस्तू आणून कामाला सुरुवात केली.
advertisement
4/7
त्यानंतर मला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. पण हळूहळू मी त्या समस्यांवर मात केली. या कारच्या मागच्या बाजूला पंखा फिरवण्यासाठी दोन प्रकारच्या मोटर्स बसवण्यात आल्या आहेत. सर्वात आधी कारला हेलिकॉप्टरसारखे दिसण्यासाठी, हेलिकॉप्टरसारखी रचना तयार केली गेली.
advertisement
5/7
त्यानंतर कारवर पंखे बसविण्यात आले आणि कारच्या मागील बाजूस पंखेही बसविण्यात आले. कारच्या वरच्या बाजूस चार पंखे लावण्यात आले आहेत.
advertisement
6/7
त्यानंतर स्ट्रक्चर बसवल्यानंतर पंखा फिरवायला सुरुवात केली पण पुन्हा तो बिघडला. पंखा फिरवण्याची यंत्रणा बदलली आणि अशा प्रकारे यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
advertisement
7/7
त्यांनी सांगितले की, ही कार मॉडिफाय करण्यासाठी 5 लाख रुपये खर्च आला. ही कार बनवण्यासाठी लागणारे पार्ट्स सहज उपलब्ध नव्हते. त्यामुळे विविध राज्यांतून भाग मागविण्यात आले. त्यामुळे ही कार बनवण्यासाठी 5 लाख रुपये खर्च आला असे ते म्हणाले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
कार की हेलिकॉप्टर? रस्त्यावर लोकांना जे दिसलं ते पाहून सर्वांना आश्चर्य; पाहा, अनोखे photos