TRENDING:

Chanakya Niti : अशी बायको म्हणजे नवर्‍यासाठी जिवंतपणीच नरक

Last Updated:
Chanakya Niti In Marathi : आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्र या ग्रंथात माणसाच्या स्वभावाविषयी अनेक गोष्टी नमूद केलेल्या आहेत. माणसाचं वैवाहिक जीवन कसं असावं, पती-पत्नीची वागणूक कशी असावी आदींबाबतचे नियम या ग्रंथात सांगितले गेले आहेत.
advertisement
1/5
Chanakya Niti : अशी बायको म्हणजे नवर्‍यासाठी जिवंतपणीच नरक
यशस्वी वैवाहिक जीवनासाठी पती-पत्नीत परस्पर विश्वास, प्रेम, सुसंवाद या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. गेल्या काही वर्षांत जीवनशैलीत मोठा बदल झाला आहे. करिअरला जास्त महत्त्व दिलं जात असल्याने साहजिकच पती-पत्नीतला संवाद कमी होताना दिसतो.
advertisement
2/5
घरातल्या स्त्रीचा स्वभाव, वर्तन चुकीचं असेल तर संसार सुखाचा होऊ शकत नाही, असं या ग्रंथात नमूद करण्यात आलं आहे. वैवाहिक जीवन नरकासमान होतं, असं आचार्य चाणक्य सांगतात.
advertisement
3/5
चाणक्यनीतीनुसार, कठोर शब्द बोलणारी स्त्री, दुष्ट स्वभावाचा मित्र हे सापासारखे असतात. अशा व्यक्तींपासून सावध राहणं गरजेचं आहे, अन्यथा जीवन मृत्यूसमान होतं.
advertisement
4/5
व्यभिचारी स्त्रीचं संगोपन करणं हे एखाद्या व्यक्तीसाठी खूप त्रासदायक ठरू शकतं, असं आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्र ग्रंथात म्हटलं आहे. अशा स्त्रीमुळे वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होतात. यामुळे प्रसंगी वैवाहिक जीवन संपुष्टात येऊन पती-पत्नी विभक्त होण्याची शक्यता असते.
advertisement
5/5
चाणक्यनीतीनुसार, ज्या घरातली स्त्री दुष्ट असते, अशा घरमालकाची अवस्था मृतदेहाप्रमाणे होते. अशा स्त्रीच्या वर्तनात कधीही सुधारणा होऊ शकत नाही, तसंच अशी स्त्री कोणाच्याही ताब्यात राहत नाही. त्यामुळे अशा स्त्रीपासून दूर राहणं गरजेचं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Chanakya Niti : अशी बायको म्हणजे नवर्‍यासाठी जिवंतपणीच नरक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल