संपूर्ण जगाला चाणक्यनीती शिकवणाऱ्या आचार्य चाणक्य यांचे गुरू कोण?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांची गुरूशिष्याबाबतची चाणक्यनीती तुम्हाला माहिती असेल. आचार्य चाणक्य हे चंद्रगुप्त मौर्य यांचे गुरू होते पण आचार्य चाणक्य यांचे गुरू कोण होते माहिती आहे का?
advertisement
1/5

आज अनेकजण आपल्या जीवनात चाणक्यनीती फॉलो करतात. आचार्य चाणक्य ज्यांना कौटिल्य, विष्णुगुप्त म्हणूनही ओळखलं जातं. त्यांनी कित्येक वर्षांपूर्वी सांगितलेली धोरणं. आजच्याही युगातही लागू होतात.
advertisement
2/5
आचार्य चाणक्य यांची चाणक्यनीती तुम्ही वाचली असेल. त्यांच्या चाणक्यनीतीत त्यांनी गुरूशिष्याबद्दलही सांगितलं आहे. गुरू कसा असावा, चांगला गुरू कसा असतो, गुरूचं महत्त्व गुरूशिष्याचं नातं कसं असतं, अशी बरीच माहिती त्यांनी दिली आहे.
advertisement
3/5
आचार्य चाणक्य हे सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांचे गुरू होते. आचार्य चाणक्य यांनी तक्षशिला विश्वविद्यालयातून शिक्षण घेतलं. सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांचे ते गुरू झाले. चंद्रगुप्त मौर्य यांना त्यांनी प्रत्येक मार्गावर मार्गदर्शन केलं. पण त्यांचे गुरू कोण होते?
advertisement
4/5
काहींच्या मते आचार्य चाणक्य यांचे गुरू योगी होते ज्यांनी त्यांना राजकारण आणि अर्थशास्त्र शिकवलं. तर आचार्य चाणक्य यांचे गुरू त्यांचे वडील चणकच होते, ज्यांच्यावरून त्यांचं नावही चाणक्य पडलं असं सांगितलं जातं.
advertisement
5/5
आचार्य चाणक्य यांच्याबाबत वैयक्तिक माहिती फारशी उपलब्ध नाही पण त्यांच्याबाबत बऱ्याच वेगवेगळ्या समजुती आहेत. चाणक्याच्या गुरूबद्दलही अनेक दंतकथा प्रचलित आहेत. या सर्व समजुती असूनही चाणक्यच्या गुरूची ओळख आजपर्यंत एक रहस्य आहे.