Guru Vakri 2025: उरले 4 दिवस! गुरू वक्री झाल्याचा 4 राशींवर बॅड इफेक्ट; 25 दिवस भयानक अडचणी-टेन्शन
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Guru Vakri 2025: नऊ ग्रहांमध्ये काही ग्रहांची स्थिती अतिशय खास मानली जाते. मोठ्या ग्रहांच्या स्थितीत होणार थोडा बदलही राशीचक्रावर मोठा इफेक्ट दाखवतो ज्योतिषशास्त्रात, गुरू ग्रहाच्या राशी परिवर्तनाला खूप विशेष मानलं जातं. गुरू ग्रह हा ज्ञान, वाढ, धार्मिकता, नफा आणि सिद्धींचे प्रतीक मानला जातो.
advertisement
1/6

गुरू हा धनु आणि मीन राशीचा अधिपती आहे. जेव्हा गुरू ग्रह वक्री होतो तेव्हा तो लोकांच्या जीवनात सुधारणा आणि नवीन सुरुवातीच्या संधी आणतो. पंचांगानुसार, मंगळवार, 11 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 10:11 वाजता गुरू कर्क राशीत वक्री होईल. त्याची ही स्थिती साधारण 25 दिवस असेल.
advertisement
2/6
ज्योतिषशास्त्रात, कोणत्याही ग्रहाचे वक्री होणे खूप अशुभ आणि नकारात्मक मानले जाते. गुरूच्या कर्क राशीत वक्री झाल्यामुळे अनेक राशींना करिअर आणि आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. तर, गुरूच्या वक्रीमुळे कोणत्या राशींना ताण येऊ शकतो ते पाहूया.
advertisement
3/6
मेष - गुरूच्या वक्री होण्यामुळे मेष राशीच्या लोकांच्या मानसिक स्थितीवर आणि खर्चावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. अचानक प्रवास किंवा परदेश प्रवासाशी संबंधित काम थांबू शकते. या काळात, तुम्हाला असं वाटू शकतं की काही केल्या कष्ट फळ देत नाहीये. कोणत्याही कायदेशीर किंवा कागदपत्रांच्या कामात घाई करू नका. ही स्वतःवर काम करण्याची वेळ आहे. उपाय म्हणून दर गुरुवारी पिवळे कपडे घाला, हळदीचा टिळा लावा आणि "ओम ब्रिम बृहस्पतेय नम:" या मंत्राचा 108 वेळा जप करा.
advertisement
4/6
मिथुन - गुरूच्या वक्री गतीमुळे मिथुन राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी संघर्ष वाढू शकतो. वरिष्ठांशी संवाद साधताना स्पष्टता बाळगा, कारण तुमच्या शब्दांचा चुकीचा अर्थ लावला जाऊ शकतो. तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याकडे लक्ष द्या. जर तुमचे काही कायदेशीर किंवा नोकरीशी संबंधित प्रकरण असतील तर धीर धरा, कारण घाई करणे हानिकारक ठरू शकते. दर गुरुवारी गरीब मुलांना किंवा गरजूंना पिवळी डाळ आणि केळी दान करा.
advertisement
5/6
तूळ - तुमच्या भाग्यगृहात गुरू ग्रह वक्री राहील. त्यामुळे प्रवास, उच्च शिक्षण किंवा धार्मिक कार्यात अडचणी येऊ शकतात. परदेशात शिक्षण किंवा काम करण्यास इच्छुक असलेल्यांनी संयम बाळगावा. तुमच्या वडिलांशी मतभेद वाढू शकतात, म्हणून तुमच्या बोलण्यात संयम ठेवा. तुमच्या जीवनातील ध्येयांचा पुनर्विचार करा; जुनी अपूर्ण इच्छा पुन्हा निर्माण होऊ शकते. दर गुरुवारी विष्णू मंदिरात पिवळी फुले अर्पण करा आणि तुळशीच्या रोपाला पाणी घाला.
advertisement
6/6
कुंभ - गुरूची वक्री गती कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनात नकारात्मकता आणेल. घरात तणाव किंवा तुमच्या आईशी मतभेद होण्याची शक्यता आहे. गाडी चालवताना निष्काळजीपणा टाळा. प्रलंबित मालमत्ता किंवा घराच्या समस्या असलेल्यांना अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते. तुमच्या वैवाहिक जीवनात गैरसमज टाळा. आर्थिकदृष्ट्या एखाद्यावर विश्वास ठेवणे हानिकारक ठरू शकते. उपाय म्हणून घरी पिवळी फुले ठेवा, दर गुरुवारी मंदिरात मिठाई अर्पण करा.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Guru Vakri 2025: उरले 4 दिवस! गुरू वक्री झाल्याचा 4 राशींवर बॅड इफेक्ट; 25 दिवस भयानक अडचणी-टेन्शन