Weather Alert: कल्याण-डोंबिवलीत वारं फिरलं, आता बर्फासारखी थंडी, हवामान विभागाचा अलर्ट
- Reported by:
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: ठाण्यासह कल्याण-डोंबिवली परिसरात हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. 10 जानेवारीला हवामान विभागाने पुन्हा अलर्ट दिला आहे.
advertisement
1/5

गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत आहेत. ढगाळ हवामानानंतर गारठा वाढला असून पुढील काही दिवसात थंडी अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. ठाण्यासह मुंबईत पहाटेच्यावेळी पारा घसरताना दिसतोय, तर दुपारी सौम्य उकडा जाणवतोय. 10 जानेवारीला थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता आहे. कल्याण-डोंबिवलीसह परिसरातील हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
2/5
वातावरण बदलामुळे दिवसेंदिवस तापमानात चढउतार होताना दिसत आहेत.10 जानेवारी रोजी कल्याण तालुक्यातील पारा 10 अंशाच्या खाली घसरला असून हवामान स्वच्छ आणि थंड आहे. किमान तापमान 9 अंश सेल्सिअस तर कमाल 28 अंश सेल्सिअस राहील. पावसाची कोणतीही शक्यता नाही.
advertisement
3/5
डोंबिवलीमध्ये हवामान स्वच्छ आणि निरभ्र राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान 10 अंश सेल्सिअस तर कमाल 34 अंश सेल्सिअस राहील. वाऱ्याचा वेग कमी-जास्त होऊ शकतो. त्यामुळे दिवसा उबदार आणि रात्री गारवा जाणवून पुन्हा सकाळी थंडीचा अनुभव येईल.
advertisement
4/5
कल्याण-डोंबिवली ग्रामीण भागात हवामान थंड आणि काहीसं धुक्याचं राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान 15 अंश सेल्सिअस तर कमाल 30 अंश सेल्सिअस असेल. सकाळी थंडी तर दुपारी किंचित उन्हाचा तडाखा जाणवेल. हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. अचानक हवामानातील बदलांमुळे आरोग्याच्या समस्या (सर्दी, खोकला) होऊ शकतात, त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.
advertisement
5/5
शनिवारी बदलापूरमध्ये हवामान अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान 16 ते 21अंश तर कमाल 30 ते 32 अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते. पहाटे आणि रात्री थंडीचा कडाका जाणवेल. शहापूर, मुरबाडमध्ये हवामान बहुतांश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान 8 अंश तर कमाल 24 अंश सेल्सिअस राहील. त्यामुळे दिवस कोरडा आणि सूर्यप्रकाशित असेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Kalyan Dombivli/
Weather Alert: कल्याण-डोंबिवलीत वारं फिरलं, आता बर्फासारखी थंडी, हवामान विभागाचा अलर्ट