Weather Alert: महाराष्ट्रातली हवा बिघडली, 'इथं' पारा 10 अंशांच्या खाली, हवामान विभागाचा अलर्ट
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: जानेवारी 2026 मध्ये हवामानात सातत्याने बदल जाणवत आहेत. पावसानंतर हवामान विभागाने वेगळाच अलर्ट दिला आहे.
advertisement
1/5

गेल्या काही दिवसांत राज्यातील हवामानात पुन्हा एकदा बदल जाणवू लागला आहे. थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढल्याने पहाटेचा गारठा अधिक जाणवत असून किमान तापमानात चढ-उतार सुरू आहेत. काही भागांत थंडीचा जोर वाढताना दिसतोय, तर काही ठिकाणी दिवसाच्या वेळेत उबदार वातावरण जाणवत आहे. आज, 10 जानेवारी रोजी राज्यातील प्रमुख शहरांमध्ये हवामान नेमकं कसं राहणार, हे पाहूया.
advertisement
2/5
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हवामान मुख्यतः स्वच्छ राहण्याचा अंदाज आहे. समुद्राच्या प्रभावामुळे येथे थंडी तुलनेने सौम्य आहे. मुंबईत आज कमाल तापमान सुमारे 31 ते 32 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. सकाळी आणि रात्री हलका गारवा जाणवेल, मात्र दिवसभर उन्हाचा प्रभाव राहणार आहे. गेल्या काही दिवसांतील ढगाळ वातावरण निवळल्याने पुढील दोन दिवसांत तापमानात फारसा बदल होणार नाही.
advertisement
3/5
पुणे आणि आसपासच्या ग्रामीण भागांत थंडीचा प्रभाव अधिक जाणवणार आहे. पहाटेच्या वेळेत दाट धुक्याची शक्यता असून किमान तापमान 10 अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाण्याचा अंदाज आहे. कमाल तापमान मात्र 29 ते 30 अंश सेल्सिअस राहील. दिवसा सूर्यप्रकाशामुळे वातावरण थोडं उबदार वाटेल, मात्र सकाळी आणि रात्री गारठा कायम राहणार आहे. पुणे ग्रामीण भागातही अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.
advertisement
4/5
मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका अधिक जाणवत आहे. नाशिक, नागपूर, अमरावती, गोंदिया, वर्धा या भागांत किमान तापमान 10 अंशांच्या आसपास किंवा त्याखाली नोंदवले जात आहे. काही ठिकाणी पहाटे दाट धुके आणि गारठा जाणवेल. नागपूरमध्ये आज कमाल तापमान सुमारे 29 अंश, तर किमान तापमान 10 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यातही सकाळी गारवा आणि दिवसा स्वच्छ आकाश असण्याची शक्यता आहे.
advertisement
5/5
पुढील काही दिवसांचा एकंदरीत अंदाज राज्यातील बहुतांश भागांत पुढील दोन ते तीन दिवस हवामान कोरडंच राहण्याची शक्यता आहे. किमान तापमानात मोठा बदल अपेक्षित नसला, तरी पहाटेचा गारठा कायम राहणार आहे. थंड वाऱ्यांमुळे सकाळी आणि रात्री थंडी जाणवेल, तर दिवसा उन्हामुळे वातावरण तुलनेने उबदार राहील. त्यामुळे राज्यभरात हिवाळ्याची ही मिश्र स्थिती पुढील काही दिवस टिकून राहण्याची शक्यता आहे
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: महाराष्ट्रातली हवा बिघडली, 'इथं' पारा 10 अंशांच्या खाली, हवामान विभागाचा अलर्ट