मयूर शुक्रवारी सकाळी पिशोर येथे आजोबांच्या अंत्यविधीसाठी गेला होता. कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तीच्या निधनाने आधीच दुःखाच्या छायेत असलेला हा तरुण अंत्यविधी आटोपून दुचाकीने कन्नडकडे परतत होता. मात्र, प्रवासादरम्यान कन्नड–पिशोर मार्गावर अचानक त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. दुचाकी रस्त्याखाली घसरत जाऊन लोखंडी खांबाला जोरदार धडकली.
Sugarcane Juice: हिवाळ्यात उसाचा रस आरोग्यासाठी चांगला असतो का? डॅाक्टरांनी स्पष्ट सांगितलं
advertisement
या भीषण धडकेत मयूरच्या डोक्याला गंभीर मार लागला आणि तो जागीच बेशुद्ध पडला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मयूरला कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
आजोबांच्या निधनाचे दुःख पचवण्याआधीच नातवाचा अकाली मृत्यू झाल्याने बाविस्कर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मयूरच्या पश्चात आई, पत्नी आणि दोन लहान मुली असा परिवार असून, घरातील कर्ता पुरुष अचानक काळाने हिरावून नेल्याने कुटुंबाची अवस्था अत्यंत विदारक झाली आहे. गावातही या घटनेमुळे शोककळा पसरली असून, हळहळ व्यक्त केली जात आहे.






