OMG! माशांना दररोज खायला घातल्या जात आहेत 5000 मिरच्या, पण का? असे मासे खाल्ले तर...
- Published by:Priya Lad
Last Updated:
Chilli feed to Fish : ज्या मिरच्या विकल्या जात नव्हत्या किंवा खराब होण्याच्या स्थितीत होत्या त्या स्थानिक शेतकऱ्यांकडून घेऊन माशांना खाऊ घातल्या जात आहेत.
advertisement
1/5

मत्स्यपालन असो वा घरात पाळलेले मासे आपण त्यांना खायला घालतो. बाजारात माशांसाठी एक वेगळ्या प्रकारचं खाणं असतं. असं असताना माशांना चक्क हिरव्या मिरच्या खायला घातल्या जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार एका तलावात माशांना दररोज तब्बल 5000 मिरच्या खायला घातलं जात आहे.
advertisement
2/5
ज्या मिरच्या विकल्या जात नव्हत्या किंवा खराब होण्याच्या स्थितीत होत्या त्या स्थानिक शेतकऱ्यांकडून घेऊन या माशांना खाऊ घातल्या जात आहेत. आता मिरची म्हणजे तिखट आपण खाल्लं तर त्याचा आपल्याला किती त्रास होतो माहितीच आहे, मग त्या माशांचं काय होत असेल ते मिरची कसे काय खात असतील, असा प्रश्न पडतोच.
advertisement
3/5
तर आधी हे मासे मिरची खात नव्हते पण नंतर गवत आणि मिरची असं एकत्र करून दिल्यानंतर ते खाऊ लागले. मिरची पाण्यातील झाडाझुडूंपाप्रमाणे व्हिटॅमिन्सनी परिपूर्ण असते आणि माशांना ते आवडतं. तसंच माणसांप्रमाणे माशांमध्ये टेस्ट बड नसतात त्यामुळे तिखट चवीचा त्यांच्यावर काही परिणाम होत नाही.
advertisement
4/5
उलट मिरचीतील कॅप्साइसिन नावाचा घटक आतड्यांसाठी फायदेशीर आहे. तो आतड्यांच्या क्रियेला उत्तेजित करतो. तो पचनप्रक्रिया चांगली ठेवतो, पचनक्रिया सुधारते आणि पोषक घटक किंवा पोषक तत्वांचं शोषण चांगल्यारित्या होतं. यामुळे माशांची वा जलद होते. तसंच त्यांची त्वचा चमकदार होते, त्यांचा रंगही सुंदर दिसते, परजीवीही त्यांच्या शरीरात राहत नाहीत, असं मासे पाळणारे लोक सांगत आहेत.
advertisement
5/5
आता मासे म्हणजे कित्येक लोक ते खातात आणि मिरची खायला घातलेले मासे सामान्य माशांच्या तुलनेत सॉफ्ट असतात आणि त्यांची चवही चांगली असते, असं सांगितलं जातं आहे. माशांना अशी मिरची खायला कुठे घातली जाते तर हा प्रकार चीनमधील आहे. मीडिया रिपोर्टनुसार हुगांग प्रांतातील चांग्शामध्ये हे तलाव आहे, जिथल्या माशांना हे मिरचीचं खाद्य दिलं जातं आहे. (सर्व फोटो : AI Generated)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
OMG! माशांना दररोज खायला घातल्या जात आहेत 5000 मिरच्या, पण का? असे मासे खाल्ले तर...