उंची, खोल दरी आणि अरुंद रनवे; भारतातले 4 सर्वात धोकादायक Airport; इथे विमान उडवताना एक्सपर्ट पायलटलाही फुटतो घाम
- Published by:Devika Shinde
Last Updated:
आज आम्ही तुम्हाला भारतातील अशाच काही धोकादायक विमानतळाबद्दल सांगणार आहोत, जिथे पविमान उतरणं किंवा उडवणं हे खायचं काम नाही.
advertisement
1/6

विमान प्रवास म्हणजे काही तासांत हजारो किलोमीटरचा प्रवास पार करणं. पण ही काही साधी गोष्ट नाही. पण आपण जेव्हा विमानात बसतो, तेव्हा त्या मागचं तांत्रिक कौशल्य, पायलटची जबाबदारी आणि हवामानाचे बदल यासगळ्या गोष्टींकडे आपण फारसं लक्ष देत नाही. आपण विमान प्रवासात आणि त्याच्या अनुभवात व्यस्त असतो. पण पायलट आणि इतर क्रु मेंमबर्स आपला हा प्रवास सुखकर होण्यासाठी खुप मेहनत घेत असतात.<span style="color: currentcolor;">आज आम्ही तुम्हाला भारतातील अशाच काही धोकादायक विमानतळाबद्दल सांगणार आहोत, जिथे पविमान उतरणं किंवा उडवणं हे खायचं काम नाही.</span>
advertisement
2/6
1. लेह (लडाख)-कुशोक बकुला रिम्पोची एअरपोर्टहा एअरपोर्ट 3259 मीटर उंचीवर आहे. विरळ हवामान, बर्फाच्छादित डोंगर आणि कमी ऑक्सिजन अशा सगळ्या अडचणींना इथे पायलटला सामोरं जावं लागतं.
advertisement
3/6
2. कांगडा, हिमाचल प्रदेश - गग्गल एअरपोर्टया एअरपोर्टवरील धावपट्टी थोडी अरुंद आहे, शिवाय हे एअरपोर्ट उंचीवर असल्याने विमान उतरवताना पायलटला पूर्ण एकाग्रतेने काम करावं लागतं.
advertisement
4/6
3. मिझोराम - लेंगपुई एअरपोर्टमिझोराममधल्या लेंगपुई एअरपोर्टची धावपट्टी पाण्याच्या नाल्यांवरून जाते. पावसाळ्यात तर हे ठिकाण खूपच धोकादायक होतं. पायलटला इथे अगदी अचूक लँडिंग करावं लागतं.
advertisement
5/6
4. कर्नाटक - मंगलोर एअरपोर्टया एअरपोर्टवर टेबलटॉप रनवे आहे, म्हणजे दोन्ही बाजूंना खोल दरी आहे. इथे 2010 साली मोठा अपघात झाला होता. विमान धावपट्टी ओलांडून थेट खाली कोसळलं होतं.
advertisement
6/6
विमानप्रवास जितका रोमांचक आहे, तितकाच त्यामागचा तंत्रज्ञान, अनुभव आणि काळजी यांचाही फार मोठा भाग आहे आणि अशा धोकादायक विमानतळांवर तर पायलटची खरी कसोटी लागते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
उंची, खोल दरी आणि अरुंद रनवे; भारतातले 4 सर्वात धोकादायक Airport; इथे विमान उडवताना एक्सपर्ट पायलटलाही फुटतो घाम