TRENDING:

GK : आमंत्रण आणि निमंत्रणमध्ये दोघांमध्ये काय आहे फरक? तुम्हाला माहितीय का कोणतं कधी वापरायचं?

Last Updated:
मराठीत यासाठी दोन शब्द आहेत ज्यामध्ये कधी आमंत्रण तर कधी निमंत्रण असं लिहिल जातं. पण अनेकांना असा प्रश्न पडतो की कोणता शब्द कधी आणि कशासाठी वापरतात?
advertisement
1/6
आमंत्रण आणि निमंत्रणमध्ये दोघांमध्ये काय आहे फरक? कोणतं कधी वापरायचं?
अनेकदा आपल्याला गोंधळ होतो की ‘आमंत्रण’ आणि ‘निमंत्रण’ या दोन शब्दांपैकी नेमका कोणता बरोबर आहे? काही लोक तर हे दोन्ही शब्द एकाच अर्थाने वापरतात, पण ते चुकीचं आहे. दोन्ही शब्दांचा अर्थ वेगळा आहे आणि त्यांचा वापरही वेगवेगळ्या ठिकाणी केला जातो.
advertisement
2/6
उदाहरणार्थ, एखाद्या कार्यक्रमाची पत्रिका तुम्हाला कधीतरी मिळालीच असेल. इंग्रजीत आपण त्याला Invitation Card म्हणतो. पण मराठीत यासाठी दोन शब्द आहेत ज्यामध्ये कधी आमंत्रण तर कधी निमंत्रण असं लिहिल जातं. पण अनेकांना असा प्रश्न पडतो की कोणता शब्द कधी आणि कशासाठी वापरतात?
advertisement
3/6
आमंत्रण कधी द्यायचं?जर कार्यक्रमात कोणी आलं किंवा नाही आलं तरी तो कार्यक्रम होणारच आहे, फक्त त्याबद्दल कळवायचं असेल तर आमंत्रण हा शब्द वापरतात. म्हणजेच, तुमच्या उपस्थितीवर कार्यक्रम अवलंबून नसतो.
advertisement
4/6
निमंत्रण कधी द्यायचं?पण जर कोणत्याही व्यक्तीशिवाय तो कार्यक्रम होऊच शकत नाही, तिची उपस्थिती महत्त्वाची आहे आणि तिला आग्रहाने बोलवायचं आहे, तर त्यासाठी निमंत्रण हा शब्द वापरतात.
advertisement
5/6
सोप्या भाषेत सांगायचं तरआमंत्रण म्हणजे कार्यक्रमाबद्दल माहिती देणे. निमंत्रण म्हणजे एखाद्याला आग्रहाने बोलावणे.
advertisement
6/6
मराठीत असे अनेक शब्द आहेत जे एकसारखे वाटतात पण त्यांचा अर्थ आणि वापर वेगळा असतो. हीच तर आपल्या भाषेची खरी गंमत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
GK : आमंत्रण आणि निमंत्रणमध्ये दोघांमध्ये काय आहे फरक? तुम्हाला माहितीय का कोणतं कधी वापरायचं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल