Plane Secret : विमानात चढल्या चढल्या टॉयलेटला जाऊ नका, एअर हॉस्टेसचा सल्ला, कारणही सांगितलं
- Published by:Priya Lad
Last Updated:
Air Hostess Flight Secret : एकतर विमानात चढण्यापूर्वी किंवा विमानाचं टेकऑफ झाल्यानंतर टॉयलेटला जाण्याचा सल्ला एअर हॉस्टेसने दिला आहे. पण का?
advertisement
1/5

एक काळ असा होता की विमान प्रवास फक्त श्रीमंतांसाठी होता. सगळ्यांनाच तो परवडणारा नव्हता. पण आता विमान प्रवास सामान्यांनाही शक्य झाला आहे, कित्येकांना परवडण्यासारखा झाला आहे. पण विमान प्रवास करताना अशा काही गोष्टी आहे, ज्या बहुतेकांना माहितीच नाहीत.
advertisement
2/5
आपण प्रवासात असलो की आपला सगळ्यात मोठा प्रश्न असतो तो टॉयलेटचा. विमानात टॉयलेट असतात पण विमानात प्रवास करताना चढल्या चढल्या टॉयलेटला जाऊ नका असा सल्ला एका एअर हॉस्टेसने दिला आहे.
advertisement
3/5
सिएरा मिस्ट नावाची एअर हॉस्टेस जिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात तिने विमानात चढताच टॉयलेटला न जाण्याचा सल्ला दिला आहे. तिने सांगितलं की, एकतर विमानात चढण्यापूर्वी टॉयलेटला जा किंवा विमान टेकऑफ करेपर्यंत विमानातील टॉयलेट वापरू नका. किमान तुम्ही हवेत येईपर्यंत प्रतीक्षा करा.
advertisement
4/5
यामागील कारणही तिने सांगितलं आहे. एक कारण म्हणजे जर तुम्ही उड्डाणापूर्वी शौचालयात गेलात, तर विमानात बसणाऱ्या अनेक प्रवाशांना येण्याजाण्यात अडचण येईल.
advertisement
5/5
दुसरं म्हणजे एअर हॉस्टेसना अनेक कामं असतात. प्रवासी मोजणं हे त्यापैकी एक आहे. जर तुम्ही शौचालयात असाल, तर एअर हॉस्टेसना तुम्ही बाहेर येईपर्यंत वाट पहावी लागेल आणि मोजणी पूर्ण झाल्यानंतरच विमान टेकऑफ करेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Plane Secret : विमानात चढल्या चढल्या टॉयलेटला जाऊ नका, एअर हॉस्टेसचा सल्ला, कारणही सांगितलं