TRENDING:

फटाक्यांचं रॉकेट आकाशात किती उंच जातं? छोट्या फटाक्यापासून स्काय शॉर्टपर्यंत सगळ्यामागचं सायन्स समजून घ्या

Last Updated:
कोणाचं रॉकेट उंच जाणार आणि कोणाचं रॉकेट मोठं फुटणार. पण या सगळ्यात तुम्ही कधी असा विचार केलाय का की रॉकेट नेमकं किती उंच जातं? आणि त्यामागचं विज्ञान काय आहे?
advertisement
1/5
छोट्या फटाक्यापासून स्काय शॉर्टपर्यंत, रॉकेट आकाशात किती उंच जातं?
दिवाळी आली की आकाशात उडणाऱ्या रंगीबेरंगी रॉकेट फटाक्यांची शोभा वेगळीच दिसते. लोकांना अशी आतिशबाजी करायला आवडते. काहींकडे तर एकमेकांमध्ये शर्यत लागते की कोणाचं रॉकेट उंच जाणार आणि कोणाचं रॉकेट मोठं फुटणार. पण या सगळ्यात तुम्ही कधी असा विचार केलाय का की रॉकेट नेमकं किती उंच जातं? आणि त्यामागचं विज्ञान काय आहे?
advertisement
2/5
फटाक्यांचं रॉकेट हे एक छोटं रासायनिक इंजिन (chemical rocket engine) असतं. त्याच्या तळाशी गनपावडर (Gunpowder) किंवा ब्लॅक पावडर भरलेली असते, जी पेटवल्यावर जळायला सुरुवात करते. या प्रक्रियेत कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन आणि गरम वायू (Hot gases) तयार होतात. हे वायू वेगाने खाली फेकले जातात आणि न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार रॉकेट वरच्या दिशेने उडतं.
advertisement
3/5
साधारणपणे बाजारात मिळणाऱ्या घरगुती रॉकेट फटाक्यांची उंची 50 ते 300 मीटर (सुमारे 150 ते 1000 फूट) इतकी असू शकते. काही मोठे, प्रोफेशनल फटाके जसे की स्काय शोमध्ये वापरले जाणारे फटाके हे 500 ते 1000 मीटर उंचीपर्यंतही जाऊ शकतात. अर्थातच, त्यांची बनावट, वापरलेले दारुचं प्रमाण आणि रॉकेटचं वजन यावर ती उंची अवलंबून असते.
advertisement
4/5
जेव्हा रॉकेट ठराविक उंचीवर पोहोचतं, तेव्हा त्यातील ‘बर्स्ट चार्ज’ (burst charge) पेटतो आणि त्यातून रंगीबेरंगी धुराचे, प्रकाशाचे तुकडे आकाशात फुलतात. हे दृश्य काही सेकंदांचं असतं, पण त्यामागे तापमान 1000 ते 1500°C पर्यंत पोहोचलेलं असतं.
advertisement
5/5
मात्र या फटाक्यांच्या उडाणीत एक धोका असतो. चुकीच्या कोनातून लाँच केल्यास ते अपघाताला कारणीभूत ठरू शकतात. म्हणूनच रॉकेट नेहमी मोकळ्या जागेत आणि सुरक्षा नियम पाळूनच उडवावं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
फटाक्यांचं रॉकेट आकाशात किती उंच जातं? छोट्या फटाक्यापासून स्काय शॉर्टपर्यंत सगळ्यामागचं सायन्स समजून घ्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल