Earth Facts : इतक्या वेगाने गरगर फिरते पृथ्वी! स्पीडचा आकडा वाचूनच चक्कर येईल
- Published by:Priya Lad
Last Updated:
पृथ्वी स्वतःभोवती आणि सूर्याभोवती गोल फिरते हे माहिती आहे. पण तिचा गोल फिरण्याचा वेग किती आहे हे अनेकांना माहिती नाही.
advertisement
1/7

पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते हे आपल्याला माहितीच आहे पण तिचा फिरण्याचा वेग किती? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
advertisement
2/7
एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीभोवती फिरत असेल तर फिरणाऱ्या गोष्टीचा फिरण्याचा वेग हा समोरील गोष्ट किती दूर आहे, यावर अवलंबून आहे.
advertisement
3/7
बुध ग्रह सूर्याच्या जवळ आहे. ज्याचा सूर्याभोवती फिरण्याचा वेग पृथ्वीच्या तुलनेत 1.6 पट जास्त आहे. बुध सूर्याभोवती 105,000 mph (47.4 km/s) वेगाने फिरत आहे.
advertisement
4/7
तर सूर्यापासून दूर असलेला ग्रह नेपच्यून आहे सूर्याभोवती 12,200 mph (5.4 km/s) वेगाने प्रवास करतो. हा वेग पृथ्वीच्या वेगाच्या फक्त 18 टक्के आहे.
advertisement
5/7
आता प्रश्न असा की मग पृथ्वीचा सूर्याभोवती फिरण्याचा वेग किती? सूर्यापासून काही अंतरावर असलेली पृथ्वी बुध वगळता इतर ग्रहांच्या तुलनेत सूर्याभोवती अधिक वेगाने फिरते.
advertisement
6/7
पृथ्वी सूर्याभोवती 67,100 मैल प्रति तास (30 किलोमीटर प्रति सेकंद) वेगाने फिरते. हा वेग अंदाजे 6.5 मिनिटांत नवी दिल्ली ते न्यूयॉर्क प्रवास करण्याइतका आहे.
advertisement
7/7
सूर्याभोवती परिभ्रमणासह पृथ्वी आकाशगंगेच्या केंद्राभोवती सुमारे 447,000 mph (200 km/s) वेगाने फिरत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Earth Facts : इतक्या वेगाने गरगर फिरते पृथ्वी! स्पीडचा आकडा वाचूनच चक्कर येईल