love marriage साठी कुटुंबाचा नकार, टेन्शन घेऊ नका, आपल्या पार्टनरसह याठिकाणी या, महिन्याभरातच होईल फायदा
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
आता व्हॅलेंटाईन विक सुरू झाला आहे. पुढच्या आठवड्यात व्हॅलेंटाईन डे आहे. अशावेळी अनेक कपल्स जे आहेत, त्यांना आपल्या प्रेमसंबंधाच्या नात्याचे रुपांतर हे प्रेमात करायचे असते. मात्र, अनेकांचे कुटुंबीय प्रेमसंबंधांना नकार देतात. तसेच अनेकदा कपल्सला लग्न करताना विविध अडचणी येतात. अशावेळी नेमकं काय करावे, हे जाणून घेऊयात. (शिखा श्रेया, प्रतिनिधी)
advertisement
1/7

आज आपण एका मंदिराबाबत जाणून घेणार आहोत, ज्याठिकाणी पूजा-अर्चना केल्याने कपल्सचे लग्न लवकर होते. रांची येथील नामकोम येथे मराशिली पर्वतावर भगवान शंकराचे मंदिर आहे. याठिकाणी असलेल्या स्वयंभू मूर्तीमध्ये लोकांची खूप आस्था आहे.
advertisement
2/7
असे म्हटले जाते की, याठिकाणी जो पूर्ण मनापासून येऊन इच्छा व्यक्त करतो त्या व्यक्तीची इच्छा नक्की पूर्ण होते. अनेकदा जोडपी नवस फेडण्यासाठी येथे येतात. मंदिराचे पुजारी शंभू यांनी याबाबत लोकल18 माहिती दिली. त्यांनी सांगितले की, माझ्या डोळ्यासमोर अशी अनेक जोडपी आली आहेत, ज्यांचे लग्न होत नव्हते आणि त्यांनी दर्शन घेतल्यानंतर महिनाभरातच येथे लग्न झाले.
advertisement
3/7
त्यांनी पुढे सांगितले की, अशी अनेक जोडपी आहेत, त्यांची लग्न मी स्वत: लावली आहेत. याठिकाणी ते इच्छा व्यक्त करतात आणि एक महिना किंवा 6 महिन्याच्या आतच त्यांचे लग्न होते. लग्नानंतर ते याठिकाणी पुन्हा देवाचे आभार मानण्यासाठी येतात.
advertisement
4/7
ते म्हणाले, मी स्वतः अशी अनेक जोडपी पाहिली आहेत ज्यांचे आईवडील त्यांच्या लग्नाला पूर्णपणे विरोध करत होते. कारण, त्यांचा धर्म वेगळा होता. येथे प्रार्थना केल्यानंतर अवघ्या एका महिन्यातच त्यांचे कुटुंबीय राजी झाले आणि आज ते अतिशय आनंदी जीवन जगत आहेत.
advertisement
5/7
तसेच त्यांनी पुढे बोलताना सांगितले की, आम्ही याठिकाणी हेसुद्धा पाहिले आहे की, याठिकाणी कपल्स आले आणि नंतर नोकरी लागल्यावर त्यांनी लग्न केले. रांची येथील बूटी मोडमध्ये एक मुलगी आहे, प्रिया. तिचे वडील तिच्या लग्नाला नकार देत होते. कारण मुलगी सीए होती आणि तिचा प्रियकर आता त्याचा व्यवसाय सुरू करत होता. मात्र, याठिकाणी दोघांनी आशीर्वाद घेतले आणि फक्त दोन महिन्यात त्यांचे लग्न झाले.
advertisement
6/7
याठिकाणी पूजेची पद्धत वेगळी आहे. तुम्हाला सुरुवातीला याठिकाणी नारळ नाही फोडायचे. जेव्हा तुमची इच्छा पूर्ण झाली तेव्हा, त्या नारळला फोडायचे आणि प्रसाद सर्वांना वाटला जातो. आतापर्यंत याठिकाणी सर्वांची इच्छा पूर्ण झाली, असेही पुजारी शंभू यांनी सांगितले.
advertisement
7/7
(सूचना - ही बातमी धार्मिक मान्यतांवर आधारित आहे. न्यूज18 लोकल याबाबत कोणताही दावा करत नाही)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
love marriage साठी कुटुंबाचा नकार, टेन्शन घेऊ नका, आपल्या पार्टनरसह याठिकाणी या, महिन्याभरातच होईल फायदा