Do You Know : रात्री लाईटजवळ दिसणारे किडे दिवसभर कुठे असतात? हे किडी काय खातात, जगतात कसे?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
या किटकांचं नाव काय? ते काय खातात? कुठून येतात? असा प्रश्न तुम्हाला पडलाय का? हे किडे माणसासाठी धोकादायक आहे का असा ही कधी प्रश्न पडला आहे?
advertisement
1/9

दरवर्षी ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या काळात हवेत उडणारे काही कीटक दिसतात, दिवसा गायब होतात. पण लाईट किंवा बल्ब लावलं की त्याच्या आवतीभोवती फिरताना किंवा जमा झालेले दिसतात. कधीकधी हे किडे शेकडोच्या संख्येनं दिव्याभोवती जमा झालेले दिसतात. गावाकडे हे किटक मोठ्या प्रमाणात दिसतात.
advertisement
2/9
पण या किटकांचं नाव काय? ते काय खातात? कुठून येतात? असा प्रश्न तुम्हाला पडलाय का? हे किडे माणसासाठी धोकादायक आहे का असा ही कधी प्रश्न पडला आहे?
advertisement
3/9
पावसाळा आणि हिवाळ्याच्या हंगामात हे किटक विशेष आढळतात. या तिटकाला महाराष्ट्रात तुडतुडा म्हणतात. तर इंग्रजीत याचं नाव लीफ-हॉपर आहे.
advertisement
4/9
आता या कीटकांची संख्या हळूहळू कमी होत चालली आहे. तपकिरी-हिरव्या रंगाचे हे कीटक विलुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. हे प्रामुख्याने रात्रीच्या वेळेस, विशेषतः पावसाळ्यानंतर थंडगार हवामानात, प्रकाशाभोवती झुंड करून उडताना दिसतात. दिवसाच्या वेळेस मात्र हे कीटक लपून बसतात.
advertisement
5/9
तुडतुडा म्हणजे कोण?या कीटकाचं वैज्ञानिक नाव आहे Nephotettix virescens. हे कीटक प्रामुख्याने भात उत्पादक भागात दिसतात, कारण त्यांचं मुख्य अन्न म्हणजे भाताच्या रोपांतील रस. त्यामुळे ग्रामीण भागांमध्येच ते मोठ्याप्रमाणात दिसतात. कोकणात देखील याचा वावर जास्त जाणवतो.
advertisement
6/9
पावसाळ्यानंतर आणि हिवाळ्याच्या आधी या कीटकांचा प्रजनन काळ असतो. प्रौढ कीटक अंडी घालतात आणि काही दिवसांत मरतात. उर्वरित काळात त्यांची अळी किंवा प्युपा झाडांच्या मुळाशी, भाताच्या पानांवर किंवा इतर झाडांच्या पानांवर आढळतात.
advertisement
7/9
का आहेत हे कीटक धोकादायक?हे कीटक थेट माणसांना हानी पोहोचवत नाहीत, पण भाताच्या पिकासाठी अत्यंत घातक असतात. हे रोपांतील रस शोषून घेतात, त्यामुळे पानांचा रंग पिवळा पडतो आणि झाडांची वाढ खुंटते. त्यामुळे शेतकरी त्यांना नष्ट करण्यासाठी कीटकनाशकांचा वापर करतात आणि त्यामुळेच त्यांची संख्या कमी होत चालली आहे.
advertisement
8/9
घरातून हे कीटक कसे दूर ठेवायचे?जर हे कीटक घराभोवती दिसत असतील, तर काही नैसर्गिक उपाय करून तुम्ही त्यांना दूर ठेवू शकता.युकलिप्टस तेलाचा स्प्रे: एका कप व्हिनेगरमध्ये 1 चमचा युकलिप्टस तेल आणि अर्धा चमचा लिंबाचा तेल मिसळा आणि लाइटभोवती स्प्रे करा.
advertisement
9/9
लॅव्हेंडर तेल: एका कप पाण्यात 2 चमचे लॅव्हेंडर तेल घालून स्प्रे करा. या सुगंधाने कीटक पळून जातात.टी-ट्री ऑईल: एका कप पाण्यात 2 मोठे चमचे टी-ट्री ऑईल मिसळा आणि कोपऱ्यांमध्ये किंवा लाइटभोवती स्प्रे करा. हे मिश्रण हिरवे कीटक आणि ढेकूण दोघांनाही दूर ठेवते.तर पुढच्या वेळी हे लहानसे "हिरवे कीटक" प्रकाशाभोवती फिरताना दिसले, तर लक्षात ठेवा. ते केवळ उडणारे कीटक नाहीत, तर भाताच्या शेतांवर परिणाम करणारे छोटे पण प्रभावी जीव आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Do You Know : रात्री लाईटजवळ दिसणारे किडे दिवसभर कुठे असतात? हे किडी काय खातात, जगतात कसे?