अखेर स्वर्ग सापडलं? हार्वर्डच्या शास्त्रज्ञाचा दावा, ठिकाणही सांगितलं, पृथ्वीपासून इतकं आहे अंतर
- Published by:Priya Lad
Last Updated:
Heaven : स्वर्ग-नरक ज्याचा उल्लेख काही धार्मिक पुस्तकांमध्ये आहे आणि आपण फक्त फिल्ममध्ये पाहतो. ते प्रत्यक्षात आहे की नाही याबाबत पुरावे नाहीत. पण एका शास्त्रज्ञाने मात्र स्वर्गाचं ठिकाण सापडल्याचा दावा करत खळबळ उडवून दिली आहे.
advertisement
1/7

मृत्यूनंतरचं जग म्हणजे स्वर्ग आणि नरक असं म्हणतात. अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये याचा उल्लेख आहे. पण प्रत्यक्षात असं कोणतं दुसरं जग आहे, स्वर्ग आणि नरक आहे की नाही हे माहिती नाही. पण आता एका शास्त्रज्ञाने मात्र आपल्याला स्वर्ग सापडल्याचा दावा केला आहे.
advertisement
2/7
भौतिकशास्त्र, गणित आणि खगोलशास्त्रात पीएचडी करणारे आणि हार्वर्डमध्ये भौतिकशास्त्र शिकवणारे माजी प्रोफेसर डॉ. मायकल गिलेन यांनी स्वर्गाचं ठिकाण शोधल्याचा दावा केला आहे. फॉक्स न्यूजवरील एका ओपिनियन लेखात त्यांनी आपण वैज्ञानिकदृष्ट्या हा दावा केल्याचं सांगितलं.
advertisement
3/7
डॉ. गिलेन यांनी एडविन हबल यांच्या 1929 च्या शोधाचा उल्लेख केला. ज्यावरून असं दिसून आलं की विश्वाचा विस्तार होत आहे आणि आकाशगंगा जितकी दूर तितकंच आपण तिच्यापासून दूर जात आहोत.
advertisement
4/7
आइन्स्टाईनच्या विशेष आणि सामान्य सापेक्षता सिद्धांतांनुसार, प्रकाशवेगावर (1,86,000 मैल प्रति सेकंद) वेळा थांबते. त्यांच्या गणनेनुसार पृथ्वीपासून 273 अब्ज ट्रिलियन मैल (273,000,000,000,000,000,000,000) मैल) अंतरावर असलेली आकाशगंगा प्रकाशाच्या वेगाने दूर जात असेल. तर हे वैश्विक क्षितिज आहे, निरीक्षण करण्यायोग्य विश्वाची बाह्य सीमा. या टप्प्यावर वेळ थांबते. इथं भूतकाळ, वर्तमान किंवा भविष्यकाळ नाही. फक्त टाइमलेसनेस आहे.
advertisement
5/7
डॉ. गिलेन म्हणतात की हे असं ठिकाण आहे जे बायबलमधील स्वर्गाच्या वर्णनाशी जुळतं. बायबलमध्ये स्वर्गाचे तीन स्तर सांगितलेत, सर्वात खालचा स्तर पृथ्वीचं वातावरण, मध्यम स्तर बाह्य अवकाश आणि सर्वोच्च स्तर जिथे देव राहतो. जिथं पोहोचता येत नाही आणि ते भौतिक नसलेले, कालातीत प्राणी (मृत आत्मे) यांचं घर आहे. ते असा युक्तिवाद करतात की विश्वाचा विस्तार स्वर्गाच्या विस्तारासारखा आहे, कारण त्याची लोकसंख्या (मृत आत्मे) वाढत आहे.
advertisement
6/7
मुख्य प्रवाहातील खगोलशास्त्रज्ञांसाठी वैश्विक क्षितीज म्हणजे फक्त 13.8 अब्ज प्रकाशवर्षे अंतर आहे. त्यापलीकडे काहीही दिसत नाही. पण डॉ. गिलेन मानतात की हे एक आध्यात्मिक क्षेत्र असू शकतं. त्यांचा असा दावा आहे की स्वर्ग वैश्विक क्षितिजावर आहे, विश्वाची ती मर्यादा जिथे आपली पोहोच संपते.
advertisement
7/7
मिररच्या रिपोर्टनुसार डॉ. गिलेन हे नास्तिक बनलेले ख्रिश्चन आहेत आणि विज्ञानाला श्रद्धेशी जोडतात. ते त्यांच्या "बिलीव्हिंग इज सीइंग" या पुस्तकात असेच विचार व्यक्त करतात. त्यांचा दावा विज्ञान आणि धर्मशास्त्रात वाद निर्माण करत आहे. अनेकांना हे इंटरेस्टिंग वाटत आहे, तर काहींनी याला फक्त अंदाज म्हटलं आहे. (सर्व फोटो : प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
अखेर स्वर्ग सापडलं? हार्वर्डच्या शास्त्रज्ञाचा दावा, ठिकाणही सांगितलं, पृथ्वीपासून इतकं आहे अंतर