TRENDING:

'या' देशावरून कधीच का उडत नाही विमान? यामागे आहेत 'ही' 5 कारणं, जी ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!

Last Updated:
विमान या देशावरून उडत नाहीत यामागे भौगोलिक, हवामानाचे आणि सुरक्षिततेचे कारण आहे. या देशाला 'जगाचे छत' म्हटले जाते आणि त्याची सरासरी उंची सुमारे...
advertisement
1/6
'या' देशावरून कधीच का उडत नाही विमान? यामागे आहेत 'ही' 5 कारणं, जी ऐकून व्हाल...
तिबेट हा एक छोटा देश असला तरी, त्याची सुंदरता पाहण्यासारखी आहे. म्हणूनच अनेक लोक आपली सुट्टीचा आनंद घेण्यासाठी तिथे जातात. पण तिबेटशी संबंधित एक आश्चर्यकारक गोष्ट आहे. ती म्हणजे, तिबेटवरून विमाने उडत नाहीत. तुम्ही कधी यामागचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला आहे का? चला तर मग, आज आम्ही तुम्हाला त्याबद्दल सांगतो.
advertisement
2/6
जर तुम्ही जगभरातील विमानांच्या मार्गांकडे लक्ष दिले, तर तुम्हाला काही असामान्य गोष्टी दिसतील. त्यापैकी एक मुख्य गोष्ट म्हणजे बहुतेक विमाने तिबेटवरून उडत नाहीत. ही आंतरराष्ट्रीय स्तरावरची कोणती धोरणात्मक बाब आहे की, यामागे काही तांत्रिक कारण आहे?
advertisement
3/6
याचे उत्तर भूगोल, हवामानातील धोके आणि सुरक्षा चिंतेमध्ये दडलेले आहे. तिबेटला "जगाचे छत" म्हणतात. हा प्रदेश अतिशय उंच कड्या आणि पर्वतांनी वेढलेला आहे. येथील सरासरी उंची सुमारे 5000 मीटर (16400 फूट) आहे. खरं तर, विमाने सहसा यापेक्षा खूप उंचीवर उडतात, पण आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यास ही उंचीच एक आव्हान बनते.
advertisement
4/6
तिबेटसारख्या डोंगराळ भागात टर्ब्युलन्स (Turbulence - हवेचा दाब बदलल्याने विमानात होणारी हालचाल) खूप सामान्य आहे. सेंट्रल लँकाशायर विद्यापीठातील अवकाश आणि एरोस्पेस अभियांत्रिकीमधील प्रमुख संशोधक डॅरेन एन्सेल यांच्या मते, "जेव्हा हवा पर्वत किंवा उंच इमारतींना धडकते, तेव्हा ती अडथळे निर्माण करते, ज्यामुळे ती अस्थिर होते. या अस्थिरतेमुळेच टर्ब्युलन्स निर्माण होतो."
advertisement
5/6
यामुळेच पर्वतांजवळ उडणाऱ्या विमानांना अनेकदा टर्ब्युलन्सचा अनुभव येतो, ज्यामुळे प्रवाशांना अस्वस्थ वाटू शकते आणि वैमानिकांसाठी ते आव्हानदायक ठरू शकते. समजा, विमानात अचानक केबिन प्रेशर (Cabin pressure) कमी झाले, ही दुर्मिळ पण गंभीर स्थिती आहे. ज्यामध्ये वैमानिकाला प्रवाशांना श्वास घेता यावा यासाठी 10000 फुटांपर्यंत (सुमारे 3000 मीटर) खाली उतरावे लागते.
advertisement
6/6
पण समस्या ही आहे की तिबेटच्या जमिनीची उंची सुमारे 16000 फूट आहे. याचा अर्थ जर वैमानिकाने विमान खाली आणले, तर ते थेट पर्वतावर आदळू शकते. तसेच, तिबेटच्या बहुतेक भागांमध्ये आपत्कालीन लँडिंगसाठी योग्य विमानतळ किंवा धावपट्टी (runway) उपलब्ध नाही. यामुळे कोणत्याही आणीबाणीच्या परिस्थितीत जीवित आणि मालमत्तेच्या नुकसानीचा धोका आणखी वाढतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
'या' देशावरून कधीच का उडत नाही विमान? यामागे आहेत 'ही' 5 कारणं, जी ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल