TRENDING:

Honeymoon Hotel : हनीमूनला गेलात, हॉटेल रूममध्ये गेल्या गेल्या लाइट लावू नका; कर्मचाऱ्यानेच सांगितलं कारण

Last Updated:
Honeymoon Hotel Facts : हनीमून म्हणजे हॉटेलमध्ये राहणं आलंच. हॉटेलचा रूम दरवाजा उघडल्या उघडल्या सगळ्यात आधी आपण लाइट आणि फॅन ऑन करतो. लाइटचं स्वीचही शक्यतो दरवाजाजवळच असतात. पण ही सगळ्यात मोठी चूक आहे. हॉटेल रूमचा दरवाजा उघडल्यावर चुकूनही लाइट ऑन करू नये, याचं कारणही शॉकिंग आहे.
advertisement
1/5
हनीमूनला गेलात, हॉटेल रूममध्ये गेल्या गेल्या लाइट लावू नका; कारण...
बऱ्याचदा जेव्हा लोक हॉटेलमध्ये चेक इन करतात तेव्हा ते सर्वात आधी त्यांच्या बॅगा टाकतात, लाईट चालू करतात आणि आराम करण्यासाठी सोफा किंवा बेडवर बसतात. शेवटी हॉटेलमध्ये राहण्याची खरी मजा आराम करणं आहे. पण तज्ज्ञ म्हणतात की ही सवय तुम्हाला अडचणीत आणू शकते. हॉटेलमध्ये प्रवेश केल्यावर लगेच लाईट चालू करण्याऐवजी, तुम्ही प्रथम रूम तपासली पाहिजे आणि तीही अंधारात.
advertisement
2/5
हॉटेल उद्योगात दीर्घकाळ कर्मचारी असलेल्या हेली व्हाईटिंग यांनी सांगितलं की, हॉटेलच्या रूममध्ये प्रवेश करताना त्यांनी पहिली गोष्ट म्हणजे ढेकूण तपासले पाहिजे. तिच्या मते जर खोलीत ढेकूण असतील तर ते अंधाराच्या वातावरणात सहज लक्षात येतात. म्हणूनच रूममध्ये प्रवेश करताना लगेच लाईट चालू करू नका, तर प्रथम बेड आणि रूमचे कोपरे तपासा असा सल्ला देते.
advertisement
3/5
हेलीच्या मते, लाइट बंद ठेवून बेड आणि गाद्यांच्या शिवणांची काळजीपूर्वक तपासणी करा. ढेकूण बहुतेकदा गाद्या, उशाच्या कव्हर, पडदे आणि फर्निचरमधील भेगांमध्ये लपतात. जर तुम्हाला लहान तपकिरी किंवा लाल कीटक, त्यांची त्वचा किंवा रक्ताचे डाग दिसले तर त्या रूममध्ये ढेकूण असल्याचे स्पष्ट लक्षण आहे.
advertisement
4/5
हेली व्हाईटिंगसल्ला देतात की जर हॉटेलच्या खोलीत ढेकूण आढळले तर ताबडतोब फोटो काढावेत आणि प्रत्येक तपशीलाची नोंद घ्यावी, जसं की चेक-इन वेळ, खोली क्रमांक आणि समस्येचा पुरावा. त्यानंतर ही माहिती ताबडतोब हॉटेल व्यवस्थापन किंवा रिसेप्शनला कळवावी. बहुतेक हॉटेल्स अशा परिस्थितीत पाहुण्यांना नवीन रूम देतात किंवा परतफेड करतात.
advertisement
5/5
पण जर तुम्ही या समस्येकडे दुर्लक्ष केलं आणि त्याच खोलीत राहिलात तर तुम्हाला रात्री चावण्याचा धोका वाढतो. तुमच्या शरीरावर खाज सुटण्याच्या खुणा असू शकतात. शिवाय ते तुमच्या सामानात घुसून तुमच्या घरी पोहोचू शकतात. म्हणून शक्य तितक्या लवकर ही समस्या ओळखणं आणि तक्रार करणं आवश्यक आहे. (सर्व फोटो - प्रतीकात्मक AI Generated)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Honeymoon Hotel : हनीमूनला गेलात, हॉटेल रूममध्ये गेल्या गेल्या लाइट लावू नका; कर्मचाऱ्यानेच सांगितलं कारण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल