यह ढाई किलो का हाथ! खरंच माणसाच्या हाताचं वजन अडीच किलो असू शकतं का?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Human hand weight : अभिनेता सनी देओलचा 'ढाई किलो का हाथ' हा डायलॉग तुम्हाला माहितीच आहे. पण खरंच एखाद्या व्यक्तीचा हात खरोखरच अडीच किलोचा असू शकतो का?
advertisement
1/5

'जब यह ढाई किलो का हाथ किसी पर पड़ता है तो आदमी उठता नहीं, उठ जाता है.' बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा फिल्ममधील हा फेमस डायलॉग. कुणी कधीच विसरणार नाही. हा डायलॉग जुना असला तरी अजूनही तो लोकांना आवडतो. पण खरंच मानवी हाताचं वजन अडीच किलो असू शकतं का? याबाबत तुम्ही कधी विचार केला आहे का?
advertisement
2/5
एखाद्या व्यक्तीच्या शरीराच्या अवयवांचं वजन त्याच्या एकूण शरीराच्या वजनावर अवलंबून असतं. ते व्यक्तीनुसार बदलू शकतं.
advertisement
3/5
एखाद्या व्यक्तीचे हात लहान दिसत असले तरी, त्यांचं वजन केवळ त्यांच्या देखाव्यावरून निश्चित केलं जाऊ शकत नाही. त्यांचे हात लहान दिसू शकतात, पण त्यांचे मसल्स वजनात योगदान देतात. म्हणून अचूक अंदाज देणं अशक्य आहे.
advertisement
4/5
काही रिपोर्टनुसार, पूर्ण मानवी हाताचे वजन एखाद्या व्यक्तीच्या शरीराच्या वजनाच्या अंदाजे 5 ते 6.5% असू शकतं. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीचं वजन 68 किलो असेल तर एका हाताचं वजन अंदाजे 3.4 ते 4.3 किलो असू शकतं. जर एखाद्या व्यक्तीचं वजन 90 किलो असेल तर एका हाताचे वजन अंदाजे 4.5 ते 5.9 किलो असू शकतं.
advertisement
5/5
याचा अर्थ असा की पूर्ण मानवी हाताचं वजन केवळ 2.5 किलोच नाही तर त्याहूनही जास्त असू शकतं.<span style="font-size: 20px;"> </span>