TRENDING:

Petrol : 100-200 रुपयांचा पेट्रोल तुम्ही गाडीत भरता का? मग तुमच्यासोबत दररोज होऊ शकते फसवणूक, वाहन असेल तर 'या' गोष्टी आधी लक्षात ठेवा

Last Updated:
मीटर शून्यावरून सुरू झाला की सर्व काही व्यवस्थित आहे असं वाटतं. तरीदेखील इतकी खबरदारी घेतली तरी इंधन फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढताना दिसतात.
advertisement
1/7
100-200 रुपयांचा पेट्रोल तुम्ही गाडीत भरता का? 'या' गोष्टी आधी लक्षात ठेवा
पेट्रोल पंपावर होणाऱ्या इंधन चोरीबद्दल तुम्ही ऐकलंच असेल. त्यासंबंधीत वेगवेगळे व्हिडीओ देखील तुम्ही पाहिले असतील. अशावेळी इंधन चोरीपासून वाचण्यासाठी लोक वेगवेगळे पर्याय सांगत असतात. त्यामुळे लोक आता थोडे सावध झाले आहेत. याच कारणामुळे आपण जेव्हा पेट्रोल किंवा डिझेल भरतो, तेव्हा बहुतेक वेळा आपली नजर मीटरवर आणि कान ‘क्लिक’ आवाजावर असते. मीटर शून्यावरून सुरू झाला की सर्व काही व्यवस्थित आहे असं वाटतं. तरीदेखील इतकी खबरदारी घेतली तरी इंधन फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढताना दिसतात.
advertisement
2/7
100-200 रुपयांचा पेट्रोल तुम्ही गाडीत भरता का? 'या' गोष्टी आधी लक्षात ठेवा
कितीही लीटर पेट्रोल मागवलं, किंवा कितीही रक्कम दिली, तरी फसवणूक होण्याची शक्यता कायम असते. पण काही सोप्या सावधानता उपायांनी आपण या धोखाधडीपासून वाचू शकतो. यासाठी काही ट्रिक्स सांगितल्या आहेत. त्या कोणत्या चला पाहू
advertisement
3/7
1. राउंड फिगर संख्यामध्ये पेट्रोल भरु नका100, 200 किंवा 500 रुपयांसारख्या ‘गोल किंवा पूर्ण आकड्यां’मध्ये पेट्रोल भरणे टाळा. काही पंपांवर मशीनमध्ये छेडछाड करून अशा आकड्यांवर ग्राहकांची फसवणूक केली जाते. अशावेळी तुम्हाला पैशांप्रमाणे थोडं कमी इंधन मिळतं आणि ते लक्षातही येत नाही.यावर आणखी एक उपाय : पैशांऐवजी लीटरमध्ये पेट्रोल मागवा. उदा. “200 रुपयांचे पेट्रोल” म्हणण्याऐवजी “5 लीटर पेट्रोल” मागा.
advertisement
4/7
2. डिजिटल मीटर असलेला पंप निवडा नेहमी डिजिटल मीटर असलेल्या पंपावरच पेट्रोल भरून घ्या. जुन्या मशीनमध्ये बिघाड होण्याची शक्यता जास्त असते आणि त्यात छेडछाड करणे सोपे असते. जर त्या मशीनचे योग्य प्रकारे मेंटेनन्स झालं नसेल तर ग्राहकांना कमी इंधन मिळण्याचा धोका जास्त असतो.
advertisement
5/7
3. मीटर ‘शून्य’ झाल्याची खात्री करापेट्रोल भरण्यापूर्वी मशीन शून्यावर सेट केली गेली आहे की नाही, हे स्वतः डोळ्यांनी तपासा. फक्त कर्मचाऱ्याच्या सांगण्यावर अवलंबून राहू नका.
advertisement
6/7
4. डिजिटल पेमेंट वापराकॅशऐवजी शक्यतो यूपीआय किंवा कार्डने पैसे द्या. यात व्यवहार अचूक होतो आणि डिजिटल रेकॉर्ड राहतो. त्यामुळे पुढे वाद निर्माण झाल्यास पुरावा मिळतो.
advertisement
7/7
5. विश्वास ठेवा पण सावधान राहाहेही खरं आहे की प्रत्येक पेट्रोल पंप फसवणूक करत नाही. पण ग्राहकांकडून आलेल्या तक्रारींमुळे अनेक पंपांविरुद्ध कारवाईही झाली आहे. त्यामुळे पंपावरील कर्मचाऱ्यांवर विश्वास ठेवतानाही थोडी सावधानता आणि शहाणपणाने वागणं आवश्यक आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Petrol : 100-200 रुपयांचा पेट्रोल तुम्ही गाडीत भरता का? मग तुमच्यासोबत दररोज होऊ शकते फसवणूक, वाहन असेल तर 'या' गोष्टी आधी लक्षात ठेवा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल