TRENDING:

विमानात बसायचं तुमचंही स्वप्न होऊ शकतं पूर्ण! आठवड्याच्या 'या' दिवशी तिकीट दर असतात कमी

Last Updated:
आयुष्यात एकदातरी विमानात बसावं, आपल्या आई-वडिलांना विमानातून जमीन कशी दिसते, आकाश कसं दिसतं ते दाखवावं, हे स्वप्न अनेकजणांनी उराशी बाळगलेलं असतं. तुम्हाला माहितीये का, सर्वच विमानांची तिकिटं महाग नसतात. जरा डोकं लावून बुकिंग केलं तर कधीना कधी हे दर आपल्यालाही परवडू शकतात. (रिया पांडे, प्रतिनिधी / नवी दिल्ली)
advertisement
1/5
विमानात बसायचं स्वप्न होऊ शकतं पूर्ण! 'या' दिवशी तिकीट दर असतात कमी
विमान तिकीट महागडं असतं यात काही दुमत नाही. परंतु त्यातल्या त्यात बचत होत असेल, तर ते कोणाला नाही आवडणार. म्हणूनच काही ट्रिक्स व्यवस्थित समजून घ्या.
advertisement
2/5
आठवड्यातून दोन दिवस विमान तिकिटं स्वस्त असतात. ते दिवस म्हणजे मंगळवार आणि बुधवार. या दिवशी जवळपास 8 ते 15 टक्के कमी दराने विमान तिकीट मिळू शकतं.
advertisement
3/5
लक्षात घ्या, विमान तिकिटांचं बुकिंग हे कधीही सकाळी 6 वाजताच्या सुमारास करायचं, इतर वेळांच्या तुलनेत तेव्हा विमान तिकिटांचे दर परवडणारे असतात. तर, याउलट संध्याकाळी आणि रात्री विमानांचे तिकीट दर सर्वाधिक असतात.
advertisement
4/5
कुठेही जायचं असेल तरी शक्यतो महिनाभर आधी विमानाचं तिकीट बुक करा. महिन्याच्या 28 तारखेला बुकिंग केलं तर उत्तम. त्यामुळे तुमची बचत होऊ शकते.
advertisement
5/5
कधीच शनिवारी किंवा रविवारी विमानाचं तिकीट बुक करू नका. शिवाय बुकिंग करताना फ्लेक्सिबल डेट निवडा. त्यामुळे तुम्हाला नंतर गरज असेल तर अधिकचे पैसे न देता प्रवासाची तारीख बदलता येते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
विमानात बसायचं तुमचंही स्वप्न होऊ शकतं पूर्ण! आठवड्याच्या 'या' दिवशी तिकीट दर असतात कमी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल