TRENDING:

Train Ticket Booking : ऐन वेळेला बॉसने अप्रुव्ह केली लिव्ह, पण जायच्या दिवशीच ट्रेनचं कन्फर्म तिकीट कसं मिळवायचं? ही घ्या सोपी ट्रिक

Last Updated:
Indian Railway Train Ticket Booking : तात्काळ सेवेशिवायही तुम्ही त्याच दिवशी रेल्वे तिकिटे बुक करून सणासुदीच्या काळात घरी पोहोचण्याची चिंता कमी करू शकता.
advertisement
1/5
ऐन वेळेला बॉसने अप्रुव्ह केली लिव्ह; सेम डे ट्रेनचं कन्फर्म तिकीट कसं मिळवायचं?
शिक्षण, करिअर, नोकरीसाठी बरेच लोक आपल्या कुटुंबापासून दूर राहतात. दिवाळीसाठी असे लोक आपल्या घरी जात आहेत. काही लोकांना दिवाळीची सुट्टी आहे. तर काहींना नाही पण त्यांनी त्यासाठी लिव्ह टाकली आणि बॉसने ती ऐनवेळेला अप्रुव्ह केली. पण आता ट्रेनने जायचं म्हटलं आणि कन्फर्म तिकीट बुक करणं एक मोठं आव्हान.
advertisement
2/5
एक तर आधीच बुकिंग करावं लागतं किंवा तात्काळ सेवेतून. पण मग आयआरसीटीसीची वेबसाइट आणि अॅप क्रॅश होतं किंवा तात्काळ तिकिट बुकिंग दरम्यान तिकिटं उपलब्ध नसतात. वेटिंग लिस्टही मोठी असते. पण तरीही तुम्ही प्रवास करणार त्याच दिवशी कन्फर्म ट्रेन तिकीट बुक करू शकता.  यासाठी रेल्वेने विकल्प स्किम आणली आहे. ज्यात तुम्ही वेटिंग किंवा आरएसी असेल तर कन्फर्म तिकिटासाठी त्याच मार्गावरील पर्यायी ट्रेन निवडू शकता.
advertisement
3/5
यासाठी IRCTC वेबसाइट किंवा मोबाईल अॅपला भेट द्या. तुमचा युझर आयडी आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा. तुम्ही जिथून प्रवास करणार आणि जिथं जाणार ते स्टेशन्स टाका आणि तुमच्या प्रवासाची तारीख टाका. वेटिंग लिस्ट दाखवत असेल तर 'विकल्प' ऑप्शन निवडा. सबमिट केल्यानंतर त्या मार्गावर धावणाऱ्या गाड्यांची यादी दिसेल. तुम्हाला हव्या त्या ट्रेनच्या नावावर क्लिक करा, नंतर स्लीपर, 3AC किंवा 2AC जो क्लास हवा तो निवडा.
advertisement
4/5
आता तुम्हाला सीटची उपलब्धता तपासावी लागेल. उपलब्ध सीटच्या शेजारी 'आता बुक करा' हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. जर सीट उपलब्ध नसेल, तर तुम्ही दुसरी ट्रेन किंवा वर्ग निवडू शकता. त्यानंतर तुमचं नाव, वय, लिंग, हवा तो बर्थ अशी माहिती भरा.  जर प्रवासी ज्येष्ठ नागरिक असेल, तर सीनियर सिटीझनवरही क्लिक करा.
advertisement
5/5
सर्व तपशील बरोबर झाल्यानंतर पेमेंट प्रक्रिया पूर्ण करा. तुमच्या बँकेच्या सुरक्षित पेमेंट गेटवेद्वारे पेमेंट करा आणि तुमचं तिकीट कन्फर्मेशन मिळवा. जास्त ट्रॅफिकमुळे ऑनलाइन सिस्टममध्ये समस्या येऊ शकतात किंवा ऑनलाइन बुकिंग करायचं नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या रेल्वे स्टेशनवरील पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टम (PRS) काउंटरवर देखील तिकिटं बुक करू शकता. यामुळे कन्फर्म तिकीट मिळेलच असं नाही पण शक्यता खूप वाढतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Train Ticket Booking : ऐन वेळेला बॉसने अप्रुव्ह केली लिव्ह, पण जायच्या दिवशीच ट्रेनचं कन्फर्म तिकीट कसं मिळवायचं? ही घ्या सोपी ट्रिक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल