अस्सल कांजीवरम साडी कशी ओळखायची? तुमची फसवणूक तर होत नाहीये ना...
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
साडी म्हणजे महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यात आवडत्या प्रकारची साडी असेल, तर काही विचारायलाच नको. कांजीवरम साडी म्हणजे अनेकजणींचा जीव की प्राण. मात्र आपण खरेदी केलेली साडी अस्सल कांजीवरम आहे का, याचीदेखील खात्री करून घ्यायला हवी, ती कशी करावी, पाहूया.
advertisement
1/4

तुम्हालाही हवी असेल अस्सल कांजीवरम साडी, तर खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवा. अस्सल कांजीवरममध्ये शुद्ध सिल्कचा समावेश असतो, त्यामुळे ही साडी वजनाला जड नसते.
advertisement
2/4
कापडावरूनच कळते साडीची शुद्धता. कांजीवरमचं कापड अस्सल असेल, तर ते छान चमकतं. जर साडी चमकदार नसली, तर ती कांजीवरम कसली?
advertisement
3/4
कापडासह कांजीवरमची ओळख जरीवरूनही होते. या साडीच्या जरीचा धागा लाल नसेल आणि पांढरा किंवा इतर कोणत्याही रंगाचा असेल, तर ती अस्सल कांजीवरम नसते. अस्सल कांजीवरम साडी ही लाल रेशमी धाग्यांपासून तयार होते. त्यावर चांदीचे धागे फिरवून जर 22 कॅरेट शुद्ध सोन्यात बुडवली जाते.
advertisement
4/4
साडीच्या पदराची मागील बाजूही पाहा. तिथे डिझाइनच्या उलट बाजूस धागे दिसले की, ती कांजीवरम साडीच असते. दरम्यान, ही माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे.