Watermelon : कलिंगड गोड आहे की नाही, फक्त 2 बोटं ठेवूनच समजेल चव, कसं ते पाहा
- Published by:Priya Lad
Last Updated:
Sweet watermelon : कलिंगड खरेदी करताना ते गोड असेल की नाही असा प्रश्न आपल्याला पडतो. तुम्हाला तुमच्या दोन बोटांनीच हे ओळखता येईल. गोड कलिंगड ओळखण्याच्या सोप्या ट्रिकचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
advertisement
1/7

उन्हाळा सुरू की बाजारात कलिंगड दिसू लागतात. कित्येक लोक कलिंगड खऱेदी करू लागले आहेत. पण कलिंगड गोड असेल की नाही असा प्रश्न आपल्याला पडतो.
advertisement
2/7
कलिंगड खरेदी करताना मग आपण विक्रेत्याला विचारतो की भैय्या कलिंगड गोड आहे ना? भैय्यासुद्धा एकदम मीठा है, असं म्हणत उत्तर देतो. शिवाय तो कापूनही लालबुंद कलिंगड दाखवतो. तिथंच कलिंगड खाऊन पाहिला तर ठिक नाहीतर फक्त भैय्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवून लालबुंद कलिंगड घेतलं पण तरी ते घरी आणून खाऊन पाहिलं की पचपचीत लागतं.
advertisement
3/7
पण आता आम्ही तुम्हाला न कापता गोड कलिंगड ओळखण्याची एकदम सोपी ट्रिक सांगणार आहोत. तुम्हाला विश्वास बसणार नाही तुमच्या हाताची फक्त दोन बोटं कलिंगडावर ठेवूनही तुम्ही कलिंगड गोड आहे की नाही हे ओळखू शकता. आता ते कसं ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
advertisement
4/7
तुम्ही पाहिलं असेल शक्यतो कलिंगडावर हिरव्या रंगाच्या रेषा असताच. यात एक रेष गडद आणि एक रेष सौम्य अशी असते. याच रेषांमध्ये तुम्हाला तुमची दोन बोटं ठेवायची आहेत.
advertisement
5/7
कलिंगडावरील गडद हिरव्या रेषेवर दोन बोटं ठेवा. त्या रेषेबाहेर बोटं जात असतील म्हणजे बोटांइतकी, बोटांपेक्षा लहान म्हणजे एकदम बारीक रेषा असतील तर ते कलिंगड बिलकुल घेऊ नका.
advertisement
6/7
पण जर कलिंगडावरील गडद हिरव्या रेषेवर दोन बोटं बरोबर मावत असतील किंवा बोटांच्या बाहेर रेष असेल, म्हणजेच गडद हिरवी रेषा एकदम मोठी असेल तर ते कलिंगड एकदम गोड.
advertisement
7/7
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओत एका महिलेने दोन बोटांनी कलिंगड ओळखण्याची ही सोपी ट्रिक दाखवली आहे. @gettishow इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यत आला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Watermelon : कलिंगड गोड आहे की नाही, फक्त 2 बोटं ठेवूनच समजेल चव, कसं ते पाहा