TRENDING:

Aajache Rashibhavishya: पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा; मेष ते मीन राशींसाठी रविवार कसा? इथं पाहा आजचं राशीभविष्य

Last Updated:
Daily Horoscope: आजचा रविवारी काहींना धनलाभाची संधी तर काहींसाठी आव्हानं घेऊन येतोय. पुण्यातील ज्योतिषी अशोक पाटील यांनी मेष ते मीन राशींचं आजचं राशीभविष्य सांगितलं आहे.
advertisement
1/13
पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा; मेष ते मीन राशींसाठी रविवार कसा? इथं पाहा आजचं राशीभविष्य
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आणि सकारात्मक असणार आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात तुमचा प्रभाव जाणवेल आणि सहकाऱ्यांकडून किंवा वरिष्ठांकडून मदत मिळेल. तसेच नवीन योजना किंवा प्रोजेक्टमध्ये तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे, पण निर्णय घेताना संयम ठेवावा लागणार आहे.
advertisement
2/13
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. आजच्या दिवशी तुम्ही कुटुंबासोबत जास्त वेळ घालवाल आणि नातेसंबंध अधिक मजबूत होतील. आज काहीसा खर्च होऊ शकतो, त्यामुळे अनावश्यक खर्च टाळा. कामात सातत्य ठेवल्यास यश मिळेल आणि दिवस समाधानकारक राहणार आहे.
advertisement
3/13
वृषभ राशीप्रमाणे मिथुन राशीच्या लोकांसाठी सुद्धा आजचा दिवस चांगला जाणार आहे. घर आणि कुटुंबात शांतता आणि समाधान राहील. वरिष्ठांकडून मदत मिळेल आणि जे काही काम तुम्ही आज कराल त्यात यश मिळण्याची शक्यता जास्त आहे. रविवार असूनही कामात व्यस्त राहाल, त्यामुळे वेळेचे नियोजन करा त्यामुळे तुमची धावपळ होणार नाही. काही महत्त्वाच्या व्यक्तींशी भेट होण्याची शक्यता दाट आहे.
advertisement
4/13
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा रविवार चांगला असणार आहे. तुमच्या राशीच्या ग्रहांची स्थिती चांगली असल्यामुळे नोकरी आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस तुमचा काहीसा भावनिक असणार आहे त्यामुळे कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना घाईगडबड टाळा आणि भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका.
advertisement
5/13
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला असणार आहे. तुमच्यातील नेतृत्वाची क्षमता तुम्हाला कामात मदत करेल. कामात प्रगती होणार असून कामात यश मिळण्याची शक्यता आहे. निर्णय घेताना घाईगडबड टाळा आणि विचारपूर्वक पावले उचला.
advertisement
6/13
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काहीसा संमिश्र राहील. काम करताना तुम्हाला काही बदल करावे लागतील आणि कामाचा वेग वाढवावा लागेल. जर शाब्दिक तणाव किंवा चकमक झाली, तर संयमाने परिस्थिती हाताळा. रागावर नियंत्रण ठेवा.
advertisement
7/13
तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा रविवार शुभ असणार आहे. तुमच्या मिळकतीचे मार्ग वाढतील आणि तुमच्या संपर्कामुळे काही नवीन संधी निर्माण होतील. कामात तुमचा प्रभाव जाणवेल. कामात काही धावपळ असली तरी तुम्ही यशस्वी व्हाल. या सगळ्या धावपळीत तुम्हाला अशक्तपणा जाणवू शकतो त्यामुळे तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या.
advertisement
8/13
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अतिशय लाभदायक असणार आहे. आजच्या दिवशी आर्थिक स्थिती मजबूत राहणार आहे तसेच ग्रहांची स्थिती अनुकूल असल्यामुळे फायदा होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपासून थांबलेले काम आज पूर्ण होऊ शकते. बोलताना संयम ठेवा, कारण राग किंवा तणावाने बोलल्यास अडचणी निर्माण होऊ शकतात.
advertisement
9/13
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साही राहील. नवीन योजना किंवा प्रोजेक्टमध्ये प्रगती होईल आणि यश मिळण्याची शक्यता आहे. तणाव कमी ठेवण्यासाठी विश्रांती घ्या आणि ध्यान किंवा हलका व्यायाम करा. नवीन ओळखी आणि संपर्कांचा फायदा होईल. खर्चावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
advertisement
10/13
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा रविवार व्यवसायात चांगला राहील. आर्थिक स्थिती मजबूत राहील, पण गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. व्यवसायात बदल करायचे असतील तर योग्य विचार करून निर्णय घ्या. कुटुंबातील महत्त्वाचे काम आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. गाडी चालवताना सावध रहा आणि खर्चावर नियंत्रण ठेवा.
advertisement
11/13
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा व्यस्त राहील. शनीची मध्यम स्थिती असल्यामुळे काही धावपळ होऊ शकते. मालमत्ता खरेदी-विक्रीसाठी विचार करत असाल तर कायदेशीर बाबी नीट तपासा आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आर्थिक व्यवहारात काळजीपूर्वक निर्णय घ्या.
advertisement
12/13
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. मन प्रसन्न राहील आणि कामात उत्साह जाणवेल. प्रवासाचा योग आहे. घरात वातावरण समाधानकारक आणि आनंदाचे राहील. कामकाजाशी संबंधित ताण कमी राहण्याची शक्यता आहे. आजच्या दिवसात महत्त्वाची कामे होऊ शकतात.
advertisement
13/13
टीप - आजचे राशीभविष्य तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून येणाऱ्या राशीवर आधारित आहे. हे सर्वसामान्य राशीभविष्य आहे. अचूक आणि वैयक्तिक राशीभविष्यासाठी जवळच्या ज्योतिषांचा सल्ला घ्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Aajache Rashibhavishya: पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा; मेष ते मीन राशींसाठी रविवार कसा? इथं पाहा आजचं राशीभविष्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल