मिळालेल्या माहितीनुसार, 10 मार्च रोजी रात्री पीडित महिला आपल्या पतीसोबत घरी झोपलेली होती. त्याच वेळी मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी घरात शिरला. त्याने महिलेचे तोंड दाबून तिला जबरदस्तीने घराबाहेर नेले. त्यानंतर तिला गावाजवळील नदीपात्रात घेऊन जाऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
advertisement
बीड हादरलं! सासरच्यांनी छळलं, तरुणाचं डोकं फिरलं, ‘त्या’ कृतीनं सगळंच संपलं
घटनेनंतर आरोपीने क्रूरतेचा कळस गाठत पीडित महिलेला गावातील चावडीत आणून दोरीने बांधून ठेवले आणि तेथून पसार झाला. काही वेळानंतर शुद्धीवर आल्यानंतर पीडितेने मदतीसाठी हाक दिली, मात्र सुरुवातीला तिला कोणीही मदत केली नाही. नंतर तिच्या नातेवाईकांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत तिला सोडवून घरी नेले.
घटनेनंतर आरोपीच्या भीतीमुळे पीडितेने दोन दिवस हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र अखेर धैर्य एकवटून तिने आई आणि मामासोबत पिंपळनेर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. तक्रारीत तिने वैभव पटेकर या व्यक्तीवर गंभीर आरोप केले असून त्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ परिसरात व्हायरल झाल्यानंतर पोलिस प्रशासनाने तातडीने कारवाई केली. पिंपळनेर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मधुसूदन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली संशयित वैभव पटेकर याला ताब्यात घेण्यात आले. पीडितेने अधिकृत तक्रार दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली असून पुढील तपास पिंपळनेर पोलिस व पिंक पथकाकडून सुरू आहे.






