HSRP नंबर प्लेट 15 ऑगस्टपर्यंत ही लावून झाली नाही तर? यावेळी मात्र... परिवाहन विभागाचा इशारा
- Published by:Devika Shinde
Last Updated:
HSRP deadline Maharashtra : तुमच्या गाडीवर अजूनही HSRP बसवलेली नसेल, तर आता वेळ आहे घाई करण्याची कारण यावेळी परिवहन विभागाने थेट कारवाईचा इशारा दिला आहे.
advertisement
1/8

महाराष्ट्रातील वाहन चालकांसाठी एक महत्त्वाची आणि अंतिम सूचना जर तुमच्या गाडीवर अजूनही HSRP (High Security Registration Plate) बसवलेली नसेल, तर आता वेळ आहे घाई करण्याची कारण यावेळी परिवहन विभागाने थेट कारवाईचा इशारा दिला आहे.
advertisement
2/8
काय आहे नवीन नियम?महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत सर्व जुन्या गाड्यांवर HSRP नंबर प्लेट बसवणं अनिवार्य केलं आहे. सुरुवातीला यासाठी 30 जून 2025 पर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे ही अंतिम तारीख आता 15 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
advertisement
3/8
जूनमध्ये अर्धा महिना उलटून गेला तरी वाहनचालकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. अजूनही अनेक वाहनांवर HSRP नंबरप्लेट बसवलेली नाही. त्यामुळे सरकारने अंतिम एक संधी देताना सांगितलं आहे की ही शेवटची मुदत असेल.
advertisement
4/8
अपॉईंटमेंट घेतली तर दंड नाहीपरिवहन विभागाने स्पष्टपणे सांगितले आहे की, जर तुम्ही 15 ऑगस्ट 2025 पूर्वी वेबसाइटवरून अपॉईंटमेंट घेतली असेल आणि त्यानुसार नंबर प्लेट लावण्याची तारीख नंतरची असेल, तर तुमच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही.
advertisement
5/8
पण परंतु, जर वाहन 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत असेल आणि 15 ऑगस्टनंतरही त्यावर HSRP लावलेली नसेल किंवा अपॉईंटमेंट घेतलेली नसेल, तर अशा वाहनांवर वाहतूक पोलिसांचे 'वायुवेग पथक' थेट कारवाई करणार आहे. यामध्ये दंड, वाहन थांबवणे यासारख्या कठोर उपाययोजना केल्या जातील.
advertisement
6/8
अपॉईंटमेंट घेण्यासाठी transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
advertisement
7/8
परिवहन विभागाने स्पष्ट केलं आहे की, ही शेवटची आणि अंतिम मुदत आहे. यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही.
advertisement
8/8
थोडक्यात सांगायचं झालं तर...1 एप्रिल 2019 पूर्वीची गाडी असेल आणि अजून HSRP नंबरप्लेट लावलेली नसेल तर लगेचच 15 ऑगस्टपूर्वी अपॉईंटमेंट घ्या. अन्यथा, यावेळी दंड आणि कारवाई निश्चित आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
HSRP नंबर प्लेट 15 ऑगस्टपर्यंत ही लावून झाली नाही तर? यावेळी मात्र... परिवाहन विभागाचा इशारा