TRENDING:

HSRP नंबर प्लेट नसल्यास किती दंड भरावा लागेल? रस्त्यावर अशी गाडी दिसली तर पोलीस काय कारवाई करतील?

Last Updated:
What is the penalty for HSRP number plate : हे केवळ एक पर्याय नाही, तर सरकारने केलेला कायदेशीर नियम आहे. जर तुमच्याकडे ही प्लेट नसेल, तर आरटीओ किंवा ट्रॅफिक पोलीस तुमच्यावर कारवाई करू शकतात.
advertisement
1/6
HSRP नसल्यास किती दंड भरावा लागेल? अशी गाडी दिसली तर पोलीस काय कारवाई करतील?
महाराष्ट्रात आता सर्व प्रकारच्या गाड्यांसाठी HSRP (High Security Registration Plate) असणं बंधनकारण केलं आहे. मग ती गाडी टुव्हिलर असोत, फोर व्हिलर किंवा थ्री व्हिलर. हे केवळ एक पर्याय नाही, तर सरकारने केलेला कायदेशीर नियम आहे. जर तुमच्याकडे ही प्लेट नसेल, तर आरटीओ किंवा ट्रॅफिक पोलीस तुमच्यावर कारवाई करू शकतात.
advertisement
2/6
HSRP ही नंबर प्लेट अॅल्युमिनियमची बनवलेली असते, ज्यामध्ये हॉट स्टॅम्प्ड क्रोम कोड, प्रेशर रिव्हेट्स आणि एक युनिक नंबर असतो. ही नंबर प्लेट गाडीच्या मालकाच्या नोंदणीशी लिंक असते, त्यामुळे गाडी चोरीला गेली, बनावट नंबर प्लेट वापर किंवा गैरवापर टाळता येतो. (High Security Number Plate Fine)
advertisement
3/6
पण अनेक वाहन मालकांनी अजूनही ही नंबर प्लेट आपल्या गाडीला लावलेली नाही. त्यामुळे ट्रॅफिक पोलीस आता यावर अधिक लक्ष देत आहेत. सरकारने ही नंबर प्लेट लावण्याची तारीख 30 जून केली आहे. तोपर्यंत ही प्लेट लावणं बंधनकारक आहे.
advertisement
4/6
महाराष्ट्र आरटीओ विभागानुसार, जर तुमच्या गाडीवर HSRP नसल्याचे (What is the penalty for HSRP number plate) आढळले, तर ₹5000 ते ₹10,000 पर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. ही रक्कम त्यात्या राज्याच्या नियमांवर आधारीत आहे. भारतात केंद्र सरकारने एप्रिल 2019 पासून सर्व नव्या वाहनांसाठी HSRP बंधनकारक केली आहे. परंतु जुन्या वाहनधारकांनाही ही प्लेट लावणं अनिवार्य करण्यात आलं आहे. विशेषतः दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान यासारख्या अनेक राज्यांत तीव्र मोहीम राबवून दंड आकारला जातो.
advertisement
5/6
पोलीस रस्त्यावर थांबवून वाहनांची तपासणी करतात. जर HSRP नसेल, तर थेट दंड आकारला जातो. काही वेळा वाहन जप्त होण्याची शक्यताही असते.
advertisement
6/6
तुम्ही ही नंबर प्लेट अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाइन ऑर्डर करू शकता -तरी वाहनधारकांनी ही नंबर प्लेट शक्य तितक्या लवकर लावावी, कारण ती केवळ नियमपूर्ती नाही, तर तुमच्या आणि गाडीच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाची आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
HSRP नंबर प्लेट नसल्यास किती दंड भरावा लागेल? रस्त्यावर अशी गाडी दिसली तर पोलीस काय कारवाई करतील?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल