TRENDING:

HSRP नंबरप्लेट लावणं 'या' गाड्यांना गरजेचं नाही; तुमची गाडी त्यामध्ये येते का? नियम लगेच जाणून घ्या

Last Updated:
HSRP म्हणजे नक्की काय? ते कोणत्या गाड्यांना लावण्याची गरज आहे किंवा नाही?मी नाही लावतर काय होईल? किंवा माझ्या गाडीसाठी ते गरजेचं आहे का वैगरे वैगरे.... असे प्रश्न तुम्हाला पण पडले आहेत का?
advertisement
1/11
HSRP नंबरप्लेट लावणं 'या' गाड्यांना गरजेचं नाही; तुमची गाडी त्यामध्ये येते का?
HSRP नंबरप्लेटचा नियम लागु झाल्यानंतर त्यासंदर्भात अनेक प्रश्न लोकांच्या मनात उभे राहिले. ज्यांना हे काय आहे आणि याचे नियम माहित नाही अशा लोकांच्या मनाच वेगळाच गोंधळ तयार झाला.
advertisement
2/11
HSRP म्हणजे नक्की काय? ते कोणत्या गाड्यांना लावण्याची गरज आहे किंवा नाही? ते का गरजेचं आहे? माझ्या गाडीचं काय करु, त्याला कसं लावू? मी नाही लावतर काय होईल? किंवा माझ्या गाडीसाठी ते गरजेचं आहे का वैगरे वैगरे....
advertisement
3/11
पण काळजी करु नका आज आम्ही तुनम्हाला याबद्दल थोडी सविस्तर माहिती सांगणार आहोत.
advertisement
4/11
महाराष्ट्र परिवहन विभागाने एक मानक कार्यप्रणाली (SOP) जारी केली, या अंतर्गत सगळ्या बाईक आणि कारला HSRP नंबरप्लेट सक्तिचं करण्यात आलं आहे. यासाठी गाडी मालकांना मुदत देण्यात आली होती. आधी ती मार्च, मग एप्रिल, मग जून अशी करत आता एक शेवटची तारीख 15 ऑक्टोबर असल्याचं विभागानं सांगितलं आहे. त्यानंतर दंड कारला जाईल असं देखील सांगण्यात आलं आहे.
advertisement
5/11
आता HSRP म्हणजे काय? (what is hsrp number plate) आणि ते कोणाला गरजेचं आहे हे जाणून घेऊ.
advertisement
6/11
HSRP चा फूल फॉर्म आहे High Security Registration Plate (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट). ही एक विशेष प्रकारची नंबर प्लेट आहे, जी चोरी, गैरवापर आणि बनावट नंबर प्लेट्स रोखण्यासाठी सरकारने बंधनकारक केली आहे. या प्लेटमध्ये एक खास क्रोमियम-आधारित होलोग्राम, लेसर-कोड आणि स्थायिक क्रमांक असतो, जो डुप्लिकेट नंबर प्लेट तयार होण्यापासून वाचवतो.
advertisement
7/11
सरकारच्या नियमानुसार, ज्या गाड्या 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत झाल्या आहेत, त्यांना HSRP नंबर प्लेट लावणे अनिवार्य आहे. बाईक, स्कूटर, कार, एसयूव्ही, जीप, ट्रक, बस, ऑटो रिक्षा या सगळ्या गाड्यांसाठी हा नियम लागू होतो. जर तुमच्या गाडीची नोंदणी 1 एप्रिल 2019 नंतरची असेल, तर तुमच्या गाडीत आधीच HSRP असेल, त्यामुळे तुम्हाला नवीन नंबर प्लेट घेण्याची गरज नाही.
advertisement
8/11
HSRP नंबर प्लेट कशी मिळवायची? (how to get hsrp number plate)ही प्लेट मिळवण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने मिळवता येते.
advertisement
9/11
ऑनलाइन पद्धत:अधिकृत HSRP च्या वेबसाइटवर जा.तुमच्या वाहनाचा रजिस्ट्रेशन नंबर टाका.गाडीची माहिती (चेसी नंबर, गाडीचा नंबर इ) द्या आणि तुमच्या जवळच्या RTO अथवा डीलरचा पत्ता निवडा.ऑनलाइन पेमेंट करा आणि अपॉइंटमेंट बुक करा.दिलेल्या तारखेला तुमच्या गाडीला HSRP प्लेट बसवून घ्या.
advertisement
10/11
ऑफलाइन पद्धत:तुमच्या जवळच्या अधिकृत वाहन डीलर किंवा RTO ऑफिसमध्ये जा. आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरा. पैसे भरून पावती मिळवा. दिलेल्या वेळेनुसार नवीन नंबर प्लेट बसवून घ्या.
advertisement
11/11
HSRP नंबर प्लेटसाठी खर्च किती? (hsrp number plate price)HSRP नंबर प्लेटचे शुल्क वाहनाच्या प्रकारानुसार वेगळे असते. दोन चाकी वाहन: ₹300 ते ₹500 चार चाकी वाहन: ₹600 ते ₹1,200 कमर्शियल वाहन: ₹1,500 ते ₹2,000
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
HSRP नंबरप्लेट लावणं 'या' गाड्यांना गरजेचं नाही; तुमची गाडी त्यामध्ये येते का? नियम लगेच जाणून घ्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल