TRENDING:

Indian Railway : ट्रेनमधील चादर तुम्हाला पाठवू शकते जेलमध्ये; वापरताना ही चूक करू नका

Last Updated:
Indian Railway Blanket : ट्रेनमध्ये प्रवास करताना प्रवाशांना चादर आणि उश्या दिल्या जातात. पण ते वापरण्याचेही काही नियम आहेत, जे प्रत्येक प्रवासाला माहिती आहेत.
advertisement
1/5
ट्रेनमधील चादर तुम्हाला पाठवू शकते जेलमध्ये; वापरताना ही चूक करू नका
रेल्वेने प्रवास करताना प्रवाशांचा प्रवास आरामदायी व्हावा यासाठी भारतीय रेल्वे पुरेपूर प्रयत्न करतं. त्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणजे ट्रेनमध्ये दिल्या जाणाऱ्या चादर. रेल्वेच्या एसी कोचमध्ये प्रवास करणाऱ्यांना रेल्वेकडून बेडशीट, उशा आणि ब्लँकेटसारख्या लिनेनच्या वस्तू पुरवल्या जातात.
advertisement
2/5
ट्रेनमध्ये मिळालेली चादर म्हणजे आपल्यासाठी आहे, असं समजून अनेक लोक ती आपल्या सोबत घेऊन जातात किंवा ती फक्त ट्रेनमध्ये वापरण्यासाठी आहे हे माहिती असूनही काही लोक ती गुपचूप आपल्या बॅगेत भरतात म्हणजेच चोरतात. हे केवळ अनैतिकच नाही तर एक गंभीर कायदेशीर गुन्हा देखील आहे.
advertisement
3/5
ट्रेनमध्ये मिळणारी चादर आणि उशी ही फक्त प्रवासादरम्यान वापरण्यासाठीच आहे. प्रवास संपल्यानंतर, त्या तिथंच ठेवायच्या असतात. त्या आपल्यासोबत घरी नेणं हे 'रेल्वे मालमत्तेची चोरी' मानलं जातं. भारतीय रेल्वे हे हलक्यात घेत नाही. तुम्हाला थेट तुरुंगवास होऊ शकतो.
advertisement
4/5
रेल्वे सुरक्षा दलाचे (RPF) अधिकारी वेळोवेळी गाड्यांमध्ये प्रवाशांची तपासणी करतात. जर कोणी योग्य कारणाशिवाय चादर, उशी किंवा ब्लँकेट घेऊन आढळला आणि तो परत केला नाही तर त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाऊ शकतं.
advertisement
5/5
भारतीय रेल्वे कायदा, 1966 च्या कलम 3 अंतर्गत, चोरी किंवा रेल्वे मालमत्तेचं नुकसान झाल्यास कठोर कारवाईची तरतूद आहे. पहिल्यांदाच गुन्हा करणाऱ्याला एक वर्षापर्यंत तुरुंगवास, 1000 रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. वारंवार गुन्हे केल्यास किंवा गंभीर उल्लंघन केल्यास 5 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि मोठा दंड होऊ शकतो. (सर्व फोटो : AI Generated)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Indian Railway : ट्रेनमधील चादर तुम्हाला पाठवू शकते जेलमध्ये; वापरताना ही चूक करू नका
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल