TRENDING:

Indian Railways : ट्रेनच्या डब्यात दररोज सुरू होतंय संशयास्पद काम, RPF च्या गुप्त तपासणीत समोर आला धक्कादायक प्रकार

Last Updated:
ट्रेनच्या डब्यात सुरू होतंय होतंय थरारक कृत्य, RPF च्या सतर्कतेमुळे झाला खुलासा.
advertisement
1/8
ट्रेनच्या डब्यात संशयास्पद काम, RPF च्या गुप्त तपासणीत समोर आला धक्कादायक प्रकार
भारतातील रेल्वेमध्ये दरवर्षी अनेक अल्पवयीन मुले हरवतात, पळून जातात किंवा त्यांना तस्करीच्या विळख्यात अडकवले जाते. या पार्श्वभूमीवर रेल्वे सुरक्षा बल (RPF) नेहमीच अशा मुलांचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांना सुरक्षितपणे पालकांकडे पोहोचवण्यासाठी सतत प्रयत्न करत असते.
advertisement
2/8
पूर्वोत्तर सीमांत रेल्वेच्या RPF ने यावर्षी जानेवारी ते जुलै 2025 या सात महिन्यांत तब्बल 738 घरातून पळून गेलेली मुले आणि 89 महिला आणि मुलांना तस्करीपासून वाचवले आहेत. तसेच या काळात 9 तस्करांना अटकही करण्यात आली आहे.
advertisement
3/8
सुटवलेल्या महिला आणि मुलांना चाइल्ड लाईन, एनजीओ, पालक आणि जीआरपी किंवा स्थानिक पोलिसांच्या ताब्यात सोपवण्यात आले आहे. यामुळे अनेक निरपराध जिवांचं आयुष्य उध्वस्त होण्यापासून वाचलं.
advertisement
4/8
16 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट 2025 दरम्यान RPF ने विविध गाड्या आणि स्थानकांवर संयुक्तपणे मोहीम राबवली. या कालावधीत 16 अल्पवयीन मुलांची सुटका करण्यात आली.
advertisement
5/8
16 ऑगस्टला, मालीगाव RPF कर्मचाऱ्यांनी गाडी क्रमांक 12346 डाउनमध्ये दोन पळून गेलेल्या मुलांना वाचवून त्यांना अनुक्रमे चाइल्ड लाईन, बोंगाईगाव आणि चिरांगकडे सुपूर्द केले. त्याच दिवशी डिब्रूगढ RPF पोस्टनेही एक मुलगा वाचवून चाइल्ड लाईन, डिब्रूगढकडे दिला.
advertisement
6/8
17 ऑगस्टला, दीमापूर RPF पोस्टने एक मुलगा वाचवून चाइल्ड लाईन, दीमापूरकडे सोपवला. 18 ऑगस्टला, कटिहार, पूर्णिया, कोकराझार आणि अलीपुरद्वार येथे पाच मुलांची सुटका झाली आणि योग्य पडताळणीनंतर त्यांना चाइल्ड लाईनकडे दिलं.
advertisement
7/8
19 ऑगस्टला, गुवाहाटी, कामाख्या, डिब्रूगढ, जलालगढ आणि अलीपुरद्वार रेल्वे स्थानकांवरून सात मुलांना वाचवण्यात आलं आणि त्यांची योग्य ओळख पटवून त्यांना पालक आणि चाइल्ड लाईनच्या ताब्यात दिलं.
advertisement
8/8
पूर्वोत्तर सीमांत रेल्वेचा RPF विभाग देखभाल मदतीची गरज असलेल्या मुलांच्या सुरक्षेसाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. प्रवाशांना आवाहन करण्यात आले आहे की, कोणतेही अनोळखी किंवा संशयास्पद मूल दिसल्यास त्वरित RPF हेल्पलाईन क्रमांक 139 वर संपर्क साधावा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Indian Railways : ट्रेनच्या डब्यात दररोज सुरू होतंय संशयास्पद काम, RPF च्या गुप्त तपासणीत समोर आला धक्कादायक प्रकार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल