TRENDING:

Indian Railways Ticket Confirm : वेटिंग लिस्टमधील एकूण किती तिकिट कन्फर्म होतात? असे आहेत भारतीय रेल्वेचे नियम, पुढच्या वेळी प्रवास करताना ठेवा लक्षात

Last Updated:
सिजनच्या वेळेला तर अनेकदा तिकिट कन्फर्म होत नाही अशावेळेला प्रवास करणं कठिण होतं. जर तुम्ही ट्रॅव्हल एजंटला अतिरिक्त पैसे देण्याची इच्छा नसेल, तर तुमचे तिकीट बहुधा वेटिंग लिस्टवरच राहते.
advertisement
1/10
वेटिंग लिस्टमधील एकूण किती तिकिट कन्फर्म होतात? असे आहेत भारतीय रेल्वेचे नियम
भारतीय रेल्वेने दररोज लाखो लोक प्रवास करतात. हा प्रवास सर्वांच्या खिशाला परवडणारा आहे शिवाय तो वेळेवर देखील लोकांना निश्चित स्थळी पोहोचवतो. त्यामुळे लोक रेल्वेनं प्रवास करणं पसंत करतात. पण रेल्वेचं तिकिट काढायचं म्हटलं की त्यासाठी दोन ते तीन महिने आधी तिकिट बुकिंग करावं लागतं. तरच कन्फर्म तिकिट मिळतं.
advertisement
2/10
पण जर तुम्ही उशिर केलात, तर मात्र तुम्हाला ते तिकिट मिळणारच नाही. सिजनच्या वेळेला तर अनेकदा तिकिट कन्फर्म होत नाही अशावेळेला प्रवास करणं कठिण होतं. जर तुम्ही ट्रॅव्हल एजंटला अतिरिक्त पैसे देण्याची इच्छा नसेल, तर तुमचे तिकीट बहुधा वेटिंग लिस्टवरच राहते.
advertisement
3/10
रेल्वे प्रवासाची मागणी नेहमीच जास्त असते. प्रवासी वैद्यकीय उपचार, नोकरी आणि पर्यटनासाठी वर्षभर रेल्वे तिकिटे बुक करत असतात. मात्र, बहुतांश वेळा टिकिट वेटिंग लिस्टवर जाते आणि प्रवाशांना मोठी चिंता लागते.
advertisement
4/10
पण आता भारतीय रेल्वेने एक खास फॉर्म्युला सांगितला आहे, ज्यामुळे तुम्ही अंदाज लावू शकता की तुमचे तिकीट कन्फर्म होईल की नाही!
advertisement
5/10
रेल्वेच्या नियमांनुसार तिकीट कसे कन्फर्म होते? भारतीय रेल्वेप्रमाणे तिकीट दोन प्रकारे कन्फर्म होऊ शकते:
advertisement
6/10
सामान्य प्रक्रिया (इतर प्रवासी तिकीट कॅन्सल केल्यावर) किंवा तत्काळ/आपत्कालीन कोटा
advertisement
7/10
स्लीपर कोचमध्ये किती सीट्स कन्फर्म होतात? भारतीय रेल्वेच्या अहवालानुसार, दररोज 21% प्रवासी तिकीट आरक्षित केल्यानंतर रद्द करतात. स्लीपर कोचमध्ये एकूण 71 सीट्स असतात, ज्यातील साधारण 14 सीट्स कन्फर्म होण्याची शक्यता असते.
advertisement
8/10
याशिवाय, 4-5% प्रवासी तिकीट घेतल्यानंतरही प्रवास करत नाहीत, त्यामुळे 25% सीट्स कन्फर्म होतात. जर एका गाडीत 10 स्लीपर कोच असतील, तर 180 नंबरपर्यंत वेटिंग लिस्ट कन्फर्म होण्याची शक्यता असते.
advertisement
9/10
हा फॉर्म्युला थर्ड एसी, सेकंड एसी आणि फर्स्ट क्लास कोचेसवर देखील लागू होतो. तसेच रेल्वे आपत्कालीन कोट्यात 10% जागा राखून ठेवते, त्यामुळे याचा लाभ काही प्रवाशांना मिळू शकतो.
advertisement
10/10
तुमचे तिकीट कन्फर्म होईल का? असा अंदाज लावा! जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल आणि तुमचे तिकीट वेटिंगवर असेल, तर वरील फॉर्म्युल्याच्या मदतीने तुम्ही अंदाज लावू शकता की तुम्हाला कन्फर्म सीट मिळेल की नाही. ही माहिती तुम्हाला पुढील तिकीट बुकिंगसाठी उपयोगी ठरू शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Indian Railways Ticket Confirm : वेटिंग लिस्टमधील एकूण किती तिकिट कन्फर्म होतात? असे आहेत भारतीय रेल्वेचे नियम, पुढच्या वेळी प्रवास करताना ठेवा लक्षात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल