रेल्वेचं तिकीट असलं तरी सावधान! प्रवासात एक चूक तुम्हाला पडेल महागात, होऊ शकते अटक
- Published by:Priya Lad
Last Updated:
ट्रेनमध्ये प्रवास करताना एक चूक अनेक प्रवाशांना महागात पडली. या सर्वांना भारतीय रेल्वेने अटक केली आहे. त्याच्याकडे तिकीट होतं तरी त्यांना दंड भरावा लागला.
advertisement
1/5

ट्रेननं प्रवास करताना रेल्वेचं तिकीट घेतलं की आपण निश्चिंतपणे प्रवास करतो. टीटी आले तरी काही भीती नाही कारण माझ्याकडे तिकीट आहे, म्हणून आपण निर्धास्त असतो. पण <a href="https://news18marathi.com/tag/indian-railway/">तिकीट असलं तरी रेल्वे प्रवास करताना काळजी घ्या</a>. एक चूक तुम्हाला महागात पडू शकते.
advertisement
2/5
एक अशी चूक जी बऱ्याच प्रवासांनी केली आहे. 335 लोकांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून रेल्वे कायद्याच्या विविध कलमांतर्गत 81575 रुपये दंड वसूल करण्यात आला.
advertisement
3/5
आता ही चूक कोणती तर कोणत्याही कारणाशिवाय चेन पुलिंग. उत्तर मध्य रेल्वेच्या झाशी विभागात 1 एप्रिल ते 21 मे 2024 पर्यंत ठोस कारणाशिवाय अलार्म चेन ओढण्याची 336 प्रकरणं नोंदवली गेलीत.
advertisement
4/5
या प्रवाशांनी स्टेशनवर उतरण्याऐवजी त्यांच्या गावाजवळ किंवा घराजवळ ट्रेन असताना तिथं उतरण्यासाठी म्हणून चेन खेचून गाडी थांबवली. योग्य कारणाशिवाय साखळी ओढणं हा गुन्हा आहे. रेल्वे कायद्यात विनाकारण चेन पुलिंग केल्यास 6 महिने ते 1 वर्षाचा कारावास आणि 1000 रुपये दंडाची तरतूद आहे.
advertisement
5/5
भारतीय रेल्वेने प्रवाशांना कोणत्याही कारणाशिवाय अलार्म चेन ओढू नये अशी विनंती केली आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. ट्रेन वेळेवर धावत नाही. याशिवाय चेन पुलिंगमुळे विद्यार्थ्यांची परीक्षा चुकते आणि आजारी व्यक्तींना वेळेवर उपचार मिळत नसल्याचे अनेकदा दिसून आलं आहे. (सर्व फोटो - फाइल)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
रेल्वेचं तिकीट असलं तरी सावधान! प्रवासात एक चूक तुम्हाला पडेल महागात, होऊ शकते अटक