भारतातील राज्य जिथं फॉलो करतात सौदी अरेबियाचे नियम, कारण काय?
- Published by:Priya Lad
Last Updated:
प्रत्येक देश तिथली संस्कृती, खाद्यपदार्थ, कायदे, नियम वेगवेगळे आहेत. भारतात वेगवेगळी राज्य आहेत, प्रत्येक राज्याची संस्कृती, कायदे, नियमही वेगवेगळे आहेत. तुम्हाला वाचूनच आश्चर्य वाटेल भारतातील एक असं राज्य जिथं चक्क सौदी अरेबियाचे नियम फॉलो करतं.
advertisement
1/5

सध्या रमजान सुरू आहे. ईदच्या दिवशी त्याची सांगता होते. इस्लाममध्ये आकाशात चंद्र दिसेल त्यानुसार ईद असते. त्यामुळे जगभरातील देशांमध्ये ईदची तारीख वेगवेगळी असते.
advertisement
2/5
साधारणपणे सौदी अरेबियामध्ये भारताच्या एक दिवस आधी ईद साजरी केली जाते, यामागील कारण भौगोलिक परिस्थिती आहे. कारण चंद्र सर्वात आधी सौदी अरेबियामध्ये दिसतो.
advertisement
3/5
भारत आणि सौदी अरेबियाच्या वेळेत सुमारे 4 तासांचा फरक आहे, त्यामुळे अनेक वेळा भारतात एका दिवशी ईदचा चंद्र दिसतो आणि दुसऱ्या दिवशी ईद साजरी केली जाते. यावर्षी भारतात ईद 31 मार्च किंवा 1 एप्रिल रोजी साजरी केली जाऊ शकते.
advertisement
4/5
पण भारतातील एकमेव राज्य आहे जिथं ईदची तारीख सौदी अरेबियानुसार ठरवली जाते. इथं ईदसाठी सौदी अरेबियाचे नियम फॉलो केले जातात. हे राज्य आहे केरळ. केरळमध्ये ईद-उल-फित्र इतर राज्यांपेक्षा एक दिवस आधी म्हणजेच सौदी अरेबियासह साजरी केली जाते.
advertisement
5/5
यामागे दोन कारणं आहेत. पहिलं म्हणजे किनारी राज्य असल्याने केरळमध्ये चंद्र कॅलेंडरच्या 29 व्या दिवशी दिसतो. बऱ्याचदा ही तारीख सौदी अरेबियाशी जुळते. दुसरी कारण म्हणजे केरळमध्ये मुस्लिम लोकसंख्या मोठी आहे आणि तिथले बरेच लोक सौदी अरेबियात काम करतात, त्यामुळे तिथले लोकही सौदी अरेबियासोबत ईद साजरी करतात.