Kavya Maran : काव्या मारन सिंगल की रिलेशनशीपमध्ये? सिक्रेट लाईफ जगतेय 'पापा की परी'!
- Published by:Shreyas
Last Updated:
क्रिकेट विश्वातली नवी सेन्सेशन म्हणजे काव्या मारन. रविवारी आयपीएल फायनलमध्ये केकेआरविरुद्धच्या पराभवानंतर सनरायजर्स हैदराबादची मालकीण काव्या मारनला पाहून अनेकांना दु:ख झालं. या सामन्यात पराभव झाल्यानंतर काव्याला अश्रू अनावर झाले. काव्याचे हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.
advertisement
1/8

काव्याला रडताना बघून अनेक बॉलिवुड स्टार्सनी या व्हिडिओवर कमेंटही केल्या. अमिताभ बच्चन यांनीही त्यांच्या ब्लॉगमध्ये काव्याचा उल्लेख केला. या सुंदर मुलीच्या डोळ्यात अश्रू पाहून वाईट वाटलं, असं बिग बी म्हणाले.
advertisement
2/8
काव्या मारन तामिळनाडूच्या प्रतिष्ठित आणि प्रभावशाली व्यावसायिक आणि राजकीय घराण्यातील मुलगी आहे. काव्याचा जन्म 6 ऑगस्ट 1992 साली चेन्नईमध्ये झाला. तिच्या वडिलांचं नाव कलानिधी मारन आहे.
advertisement
3/8
काव्याचे वडील कलानिधी मारन सन टीव्हीचे मालक आहेत. सन टीव्ही मोठी मीडिया कंपनी आहे, ज्याचे 33 पेक्षा जास्त चॅनल आहेत. 1993 साली सन टीव्ही सुरू झालं होतं. कलानिधी मारन यांची नेटवर्थ तीन बिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 25 हजार कोटी आहे.
advertisement
4/8
काव्याची आई कावेरी मारनही यशस्वी बिजनेस वुमन आहे. 2023 साली कावेरी मारन यांना बिजनेस टुडे कडून मोस्ट पॉवरफुल बिजनेस वुमन म्हणून निवडण्यात आलं. कावेरी मारन सन टीव्ही नेटवर्कच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत. सन टीव्हीचा एकूण रेव्हेन्यू 4 हजार कोटी आहे. सन टीव्हीचे तामीळ, तेलगू, कन्नड, मल्ल्याळम, बंगाली आणि मराठी चॅनल आहेत.
advertisement
5/8
काव्याचे आजोबा मुरासोली मारन डीएमकेचे मोठे नेते होते. ते डीएमकेचे संस्थापक एम. करुणानिधीचे पुतणे होते. मुरासोली 36 वर्ष खासदार आणि चार पंतप्रधानांच्या कार्यकाळात केंद्रीय मंत्री होते. 23 नोव्हेंबर 2003 ला त्यांचं निधन झालं. काव्याचे काका दयानिधी मारनही डीएमकेचे मोठे नेते आहेत. मनमोहन सिंह यांच्या सरकारमध्ये ते मंत्री होते.
advertisement
6/8
प्रभावी राजकीय आणि व्यावसायिक कुटुंब असूनही काव्या मारनचं पर्सनल लाईफ फारच सिक्रेट आहे. काव्याचं वय जवळपास 32 वर्ष आहे. सोशल मीडियावरही काव्या ऍक्टिव्ह नाही.
advertisement
7/8
काव्या सनरायजर्स हैदराबादसह दक्षिण आफ्रिकेच्या टी-20 लीगमधल्या टीमचीही मालकीण आहे. काव्या तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. इन्स्टाग्राम तसंच एक्सवरही काव्याचं व्हेरिफाईड अकाऊंट नाही. सनरायजर्सच्या टीमच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काव्याचे टीमसोबत बोलतानाचे काही व्हिडिओ आहेत.
advertisement
8/8
काव्याचं पर्सनल लाईफ फारच सिक्रेट असल्यामुळे ती सिंगल आहे का रिलेशनशीपमध्ये याबाबत कुठेही माहिती उपलब्ध नाही, पण काव्याच्या लग्नाबाबत मारन कुटुंबाने काही नियोजन केलं असतं तर मीडियामध्ये याच्या बातम्या नक्कीच समोर आल्या असत्या. काव्याने मात्र तिचं वैयक्तिक आयुष्य गुपित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Kavya Maran : काव्या मारन सिंगल की रिलेशनशीपमध्ये? सिक्रेट लाईफ जगतेय 'पापा की परी'!