इथं मिळतो 'खराब चाय', तरीही असते गर्दी; एकदा चव चाखली ही लोक पुन्हा पुन्हा येतात
- Published by:Priya Lad
Last Updated:
Kharab Chai Shop : खराब चायचं दुकान, तरी इथं लोकांची गर्दी हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. हे दुकान कोणतं आणि लोक तिथं का जातात हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल.
advertisement
1/5

चहा म्हणताच अनेकांना चहा हवाहवासा झाला असेल. भारतात चहाप्रेमींची कमी नाही. त्यामुळे तुम्हाला रस्त्यावर, ऑफिसमध्ये, स्टेशनवर, बस स्टँडवर जाल तिथं चहाची टपरी, चहाचं दुकान किंवा चहावाला दिसेल. कुठे चहा चांगला मिळतो, कुठे नाही याची माहितीही चहाप्रेमींना असते. शक्यतो लोक जिथं चांगला चहा मिळतो तिथंच जातात. पण आम्ही तुम्हाला सांगितलं की एक असं ठिकाण जिथं खराब चाय मिळतो तरी लोकांची गर्दी असते, तर?
advertisement
2/5
खराब चाय मिळतो आणि तो पिण्यासाठी लोकांची गर्दी हे वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. पण इथं दररोज 15 लीटर दुधापासून 150-200 कप चहा बनवला जातो.
advertisement
3/5
अयोध्या-बासखरी महामार्गावरील गौरा बसंतपूर गावाजवळील हे चहाचं दुकान. तीन वर्षांपासून प्रसिद्ध असलेल्या या दुकानाने तिथून जाणाऱ्या प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतलं आहे. चहाविक्रेत्याच्या मते, एकदा लोक इथं चहाची चव चाखतात ते नेहमीच परत येतात.
advertisement
4/5
'खराब चाय' असं या दुकानाचं नाव आहे. सुरुवातीला दुकानावरील बोर्ड, दुकानाचं नाव पाहून लोक आश्चर्यचकित होतात, तरी नंतर चहाचा आस्वाद घेण्यासाठी थांबतात. चांगल्या चहाचा आस्वाद घेण्यासाठी लोक खराब चायच्या दुकानात गर्दी करतात.
advertisement
5/5
या दुकानातील चहाविक्रेता राजेश कुमार गौरा बसंतपूर इथं राहणारा जो आधी पान स्टॉल चालवत होता. 3 वर्षांपूर्वी त्याने चहाचं दुकान उघडलं. तो म्हणाला चहाच्या दुकानांमध्ये स्वादिष्ट, मैत्री चहा असे वेगवेगळ्या नावांचे बोर्ड दिसतात म्हणून मला खराब चाय असं बोर्ड लावण्याची आयडिया आली आणि मी ते केलं. (सर्व फोटो प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
इथं मिळतो 'खराब चाय', तरीही असते गर्दी; एकदा चव चाखली ही लोक पुन्हा पुन्हा येतात