TRENDING:

Los angeles wildfire : आजूबाजूचं सगळं खाक, वाचला फक्त एक बंगला, घराच्या जवळही गेली नाही आग, हा काय चमत्कार?

Last Updated:
लॉस एंजेलिसमध्ये लागलेल्या आगीत हजारो इमारती, घरांची राख झाली आहे. असं असताना हा एकमेव बंगला मात्र जसाच्या तसा उभा आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
advertisement
1/7
सगळं खाक, वाचला फक्त एक बंगला, घराच्या जवळही गेली नाही आग, हा काय चमत्कार?
अमेरिकेच्या लॉस एंजिलेसमध्ये आगीने हाहाकार माजवला. कित्येक इमारती जळून खाक झाल्या. हजारो एक जमिनीवर राखच राख झाली. पण या सगळ्यात एका बंगल्याला मात्र आगीनं काहीचं केलं नाही.
advertisement
2/7
आजूबाजूचं सगळं काही खाक झालेलं असताना एक बंगला मात्र जसाच्या तसा उभा राहिला आहे. आग या बंगल्याच्या जवळही गेली नाही. यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या बंगल्याचे फोटोही व्हायरल होत आहेत.
advertisement
3/7
मालिबूमध्ये हा बंगला आहे. ज्याची किंमत 9 मिलियन डॉलर म्हणजे जवळपास 77 कोटी रुपये आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार हा बंगला 64 वर्षांचे वेस्ट मॅनेजमेंट एक्झिक्युटिव्ह डेव्हिड स्टिनर यांचा आहे.
advertisement
4/7
आजूबाजूची घरं आगीत खाक झालेली असताना आपला बंगला आगीत वाचला हे समजल्यावर डेव्हिड स्टिनर  यांनाही विश्वास बसला नाही.
advertisement
5/7
आता आगीच्या विळख्यातून हा एकमेव बंगला वाचण्याचं कारण काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याबाबत सांगताना डेव्हिड म्हणाले की,  त्यांचं घर वाचण्याचं कारण म्हणजे ते मजबूत आणि आधुनिक संरचनेचं आहे.
advertisement
6/7
भूकंपाचा धोका लक्षात घेता डिझाइन करण्यात आलेलं हे घर. जे दगडापासून बनवलेलं आहे. त्याचं छत आगीपासून संरक्षण देणारं आहे.
advertisement
7/7
त्याचे पाइलिंग्स 50 फूट पर्यंत बेड्रॉकमध्ये लावण्यात आले. ज्यामुळे समुद्राच्या लाटा घराच्या खालील भिंतीला आदळल्या तरी घर स्थिर राहतं. (सर्व फोटो : Dailymail/APF vai Getty image)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Los angeles wildfire : आजूबाजूचं सगळं खाक, वाचला फक्त एक बंगला, घराच्या जवळही गेली नाही आग, हा काय चमत्कार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल