कुठे ट्रेन, कुठे एरोप्लेन...चक्क हवेतही जेवण, 'या' रेस्टॉरंट्समध्ये एकदातरी जा!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
'गरम धरम' हे रेस्टॉरंट बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना समर्पित आहे. या रेस्टॉरंटच्या आतील भागात धर्मेंद्र यांची संपूर्ण चित्रपट कारकीर्द साकारण्यात आली आहे.
advertisement
1/7

आपण गंमतीत म्हणतो की, मी जगण्यासाठी जेवत नाही, तर जेवणासाठी जगतो. मात्र तसं पाहिलं तर आपण आपल्या चवीचे चोचले ज्या पद्धतीने पुरवतो, त्यावरून आपण जेवणासाठीच जगतो हे काही अंशी खरंदेखील आहे. विविध ठिकाणच्या हॉटेलमध्ये जवळपास सारखेच पदार्थ मिळत असले, तरी त्या त्या पदार्थाला त्या त्या जागेची एक वेगळी चव असते. राजधानी दिल्लीतील एकापेक्षा एक रेस्टॉरंट्सबाबत तर काही बोलायलाच नको. अनेक पर्यटक केवळ काही खास पदार्थांची चव चाखण्यासाठी दिल्ली गाठतात. तुम्हीसुद्धा यापैकीच एक खाद्यप्रेमी असाल, तर आज आपण दिल्लीच्या काही अनोख्या रेस्टॉरंट्सबाबत जाणून घेऊया.
advertisement
2/7
दिल्लीचं तिहार तुरुंग पाहून भल्याभल्यांना घाम फुटतो. मात्र या तुरुंग परिसरात असलेल्या 'तिहार फूड कोर्टा'त अतिशय स्वादिष्ट जेवण मिळतं. आठवडाभर सुरू असणाऱ्या या फूट कोर्टात 300 रुपयांमध्ये पोटभर जेवण होतं. सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 5 वाजल्यापासून रात्री 10:30 वाजेपर्यंत हे फूड कोर्ट खुलं असतं. कैद्यांच्या पुनर्वसनाचा एक भाग म्हणून ते सुरू करण्यात आलं आहे.
advertisement
3/7
आयुष्यात एकदातरी विमानात बसावं, अशी लाखो लोकांची इच्छा असते. दिल्लीतील एका रेस्टॉरंटच्या रूपाने आपली ही इच्छा पूर्ण होते. रोहिणी भागातील ऍडव्हेंचर आयर्लंडमध्ये असलेल्या 'एरोप्लेन रेस्टॉरंट'चं बांधकाम पूर्णपणे विमानासारखं आहे. इथे एकावेळी 100 ते 150 ग्राहक बसून जेवू शकतात. एरोप्लेनच्या पंखांकडील भागांमध्ये स्पेशल लंच आणि डिनरची व्यवस्थाही करण्यात आली आहे. सकाळी 11 ते रात्री 11 या वेळेत आठवडाभर हे रेस्टॉरंट खुलं असतं. 500 ते 600 रुपयांच्या खर्चात इथे दोन लोकांचं पोटभर जेवण होऊ शकतं.
advertisement
4/7
दिल्ली-एनसीआरच्या नोएडा सेक्टर 18मधील ब्लॉक पॉकेट येथे असलेलं 'गरम धरम' हे रेस्टॉरंट बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना समर्पित आहे. या रेस्टॉरंटच्या आतील भागात धर्मेंद्र यांची संपूर्ण चित्रपट कारकीर्द साकारण्यात आली आहे. आठवडाभर दुपारी 12 वाजल्यापासून रात्री 11:30 वाजेपर्यंत हे रेस्टॉरंट खुलं असतं. इथे 800 ते 900 रुपयांमध्ये पोटभर जेवण होतं.
advertisement
5/7
'ओरिएंट एक्सप्रेस' या पूर्ण युरोपची सफर देणाऱ्या ट्रेनच्या आधारावर 'हॉटेल ताज पॅलेस न्यू दिल्ली' हे पंचतारांकित हॉटेल उभारण्यात आलं. या ट्रेन रेस्टॉरंटचे सर्व डबे एकसारखेच आहेत. युरोपमधील लोकप्रिय पदार्थांचा आस्वाद या हॉटेलमध्ये घेता येतो. आपण आठवडाभरात कोणत्याही दिवशी सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 11:45 वाजेपर्यंत इथे जाऊ शकता. मात्र हे हॉटेल प्रचंड महागडं आहे. इथे पोटभर जेवणासाठी 12000 रुपये खर्च करावे लागतात.
advertisement
6/7
'एकोज कॅफे' हे दिल्लीतील मुकबधीर कर्मचाऱ्यांकडून चालवलं जाणारं कॅफे आहे. म्हणूनच इथे प्रत्येक टेबलवर काही बटण आणि दिवे लावलेले आहेत. यातील विशिष्ट बटण दाबल्यावर विशिष्ट दिवा पेटतो, ज्यावरून वेटरना ग्राहकांची मागणी कळते. वेगवेगळ्या मागण्यांसाठी वेगवेगळी निर्देशक भाषा ठरविण्यात आली आहे. शिवाय डिश कोड आणि क्वांटिटी लिहिण्यासाठी एक पेन आणि पेपरही प्रत्येक टेबलवर असतं. दिल्लीच्या जीटीबी नगरातील हडसन लेनमध्ये असलेलं हे कॅफे आठवडाभर सुरू असतं. आपण इथे सकाळी 11 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत जाऊ शकता. 1200 रुपयांमध्ये इथे पोटभर जेवण मिळतं.
advertisement
7/7
जवळपास सर्व रेस्टॉरंट्समध्ये जमिनीवर ठेवलेल्या खुर्चीत बसून जेवणाची व्यवस्था असते. मात्र जगभरात असेही काही रेस्टॉरंट आहेत, जिथे हवेत तरंगणाऱ्या खुर्चीत बसून जेवता येतं. दिल्लीतील 'फ्लाय डायनिंग रेस्टॉरंट'देखील त्यापैकीच एक. नोएडामध्ये असलेल्या या रेस्टॉरंटमध्ये एकावेळी 24 लोक हवेत तरंगणाऱ्या खुर्च्यांमध्ये बसून जेवणाचा आस्वाद घेऊ शकतात. आपण खुर्चीत बसल्यावर खुर्चीला एका क्रेनच्या मदतीने वर उचललं जातं आणि 50 मीटर उंचीवर जाऊन सर्व खुर्च्या थांबतात, तिथेच तुम्हाला जेवायचं असतं. आठवड्याभरात कोणत्याही दिवशी दुपारी 12 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत कधीही आपण या रेस्टॉरंटमध्ये जाऊ शकता. इथे एका वेळच्या जेवणासाठी 2499 रुपये खर्च करावे लागतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
कुठे ट्रेन, कुठे एरोप्लेन...चक्क हवेतही जेवण, 'या' रेस्टॉरंट्समध्ये एकदातरी जा!