मुस्कान असो वा सोनम! लग्न केलं पण फेल का ठरलं? संशोधनातून मोठं रहस्य उलगडलं
- Published by:Priya Lad
Last Updated:
Marriage Kundali : महिला ज्यांनी स्वतःचा संसार स्वत:च्या हाताने उद्ध्वस्त करून टाकला. मुस्कान, सोनमसारख्या आणखी कितीतरी महिलांची अशी प्रकरणं समोर आली. ही अशी लग्न फेल का ठरत आहेत? यामागील कारण शोधण्यात आलं. लग्नाबाबत मोठं रहस्य उघड झालं आहे.
advertisement
1/7

मेरठची मुस्कान आणि इंदूरची सोनम, काही दिवसांपूर्वी चर्चेत आलेल्या या दोन महिला. दोघींनीही स्वत:च्या पतीचा जीव घेतला, स्वतःचा संसार स्वत:च्या हाताने उद्ध्वस्त करून टाकला. मुस्कान, सोनमसारख्या आणखी कितीतरी महिलांची अशी प्रकरणं समोर आली. ही अशी लग्न फेल का ठरत आहेत? यामागील कारण शोधण्यात आलं. लग्नाबाबत मोठं रहस्य उघड झालं आहे.
advertisement
2/7
इंदूरची सोनम गुप्ता, मेरठच्या मुस्कान यांच्या बातम्यांमुळे सात जन्मांच्या लग्नाच्या बंधनावर एक नवीन वाद निर्माण झाला आहे. या घटनांमध्ये बीएचयूच्या ज्योतिष विभागाच्या धर्म विज्ञान विद्याशाखेतील प्राध्यापक विनय पांडे आणि त्यांच्या टीमने एक अभ्यास सुरू केला.
advertisement
3/7
हा अभ्यास पूर्वांचल, बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि शेजारील देश नेपाळमध्ये करण्यात आला. लग्नाच्या 3 वर्षांच्या आत घटस्फोटापर्यंत पोहोचलेल्या प्रकरणांचा प्रामुख्याने अभ्यासात समावेश करण्यात आला.
advertisement
4/7
दोन टप्प्यांतून डेटा गोळा करण्यात आला. प्रथम बीएचयूच्या ज्योतिष ओपीडीत आलेल्या देशभरातील जोडप्यांना केस स्टडी म्हणून समाविष्ट करण्यात आलं. दुसरं म्हणजे संशोधकांनी केस स्टडी म्हणून अंदाजे 250 जोडप्यांची निवड करण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आणि राज्यांमध्ये प्रवास केला.
advertisement
5/7
त्यांनी केलेल्या संशोधनातून असं दिसून आलं आहे की, ज्या जोडप्यांची कुंडली जुळत नाहीत त्यापैकी फक्त 37 टक्के विवाहच आयुष्यभर टिकतात. ही जोडपी प्रेम आणि समर्पणाने त्यांचं वैवाहिक जीवन टिकवू शकतात. तर ज्या जोडप्यांची कुंडली जुळते त्यांचा यशाचा दर 67 टक्क्यांहून अधिक आहे.
advertisement
6/7
संशोधनात असं नोंदवलं की ज्यांची कुंडली जुळत नाहीत पण त्यांचं वैवाहिक जीवन चांगले जात आहे, त्यांची कुंडली जुळवली गेली तेव्हा ती चांगल्या गुणांमुळे जुळली.
advertisement
7/7
संशोधन अजूनही चालू आहे आणि भविष्यात या संशोधनाचा विवाहांवर काय परिणाम होईल हे पाहणं मनोरंजक असेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
मुस्कान असो वा सोनम! लग्न केलं पण फेल का ठरलं? संशोधनातून मोठं रहस्य उलगडलं